● गावागावात होत आहे उत्साहात स्वागत
Political News | सदगुरु जगन्नाथ बाबा संस्थान भांदेवाडा येथे जगन्नाथ महाराज मंदिर येथे दर्शन घेऊन तालुक्यातील यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी खा. प्रतिभा धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतक-यांच्या विविध समस्या आणि मतदारसंघातील विविध प्रश्नांवर शेतकरी न्याय यात्रा 16 ऑगष्ट पासुन सुरु करण्यात आली आहे. कॉग्रेसच्या न्याय याञेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील विभाग निहाय दौरा करून वणी येथे या यात्रेची सांगता होणार आहे. The Congress ‘nyay yatra’ is getting an enthusiastic response.
खा. प्रतिभा धानोरकर यांनी यांत्रेला हिरवी झेंडी दाखवली. न्याय याञेत काँग्रेसचे कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. त्यानंतर ही यात्रा राजूर, पळसोनी, मुर्धोनी, मोहुर्ली, विरकुंड, बोर्डा, साखरा, घोन्सा, रासा येथे गेली. या यात्रेचे गावोगावी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यात्रेचे मार्गदर्शक व माजी आमदार वामनराव कासावार व यात्रेचे मुख्य संयोजक आशिष खुलसंगे यांनी यात्रेची भूमिका स्पष्ट केली.

न्याययात्रा मारेगाव तालुक्यातून सुरू करण्यात आली होती. मारेगाव तालुका तीन दिवस व झरी तालुक्यात दोन दिवस न्याय याञेने कॉग्रेस कार्यकर्त्यात चैतन्य निर्माण केले. शेतकरी शेतमजूर युवकांच्या समस्या संयोजक आशिष खुलसंगे यांनी जाणून घेतल्या. मारेगाव झरी तालुक्यात शेतकरी न्याय यात्रेला उदंड प्रतिसाद लाभला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या विश्रांतीनंतर 16 ऑगस्टला आराध्य दैवत जगन्नाथ बाबा देवस्थान भांदेवाडा येथून शेतकरी न्यायात्रेला सुरुवात करण्यात आली.
न्याया यात्रेत मोठ्या प्रमाणात महिला पुरुष या सह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ऍड देविदास काळे तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, महिला जिल्हाध्यक्ष संध्या बोबडे, डॉ महेंद्र लोढा, राजू कासावार, राजू एलटीवार, जय आबड, महिला शहराध्यक्ष श्यामा तोटावर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थित होते.
Rokhthok News






