Home Breaking News विकासाचे व्हिजन असणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

विकासाचे व्हिजन असणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

● सुसंस्कृत नेतृत्व विजयबाबू चोरडिया

C1 20240904 10255409

सुसंस्कृत नेतृत्व विजयबाबू चोरडिया

Wani News | वणीतील सामाजिक कार्यकर्ते, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य व परिसरात दातृत्वाचे धनी अशी ओळख असलेले विजय चोरडिया यांचा आज वाढदिवस. सर्वसामान्यांच्या कल्याणाकरिता कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता अविरत कार्य करीत असलेले विजयबाबू विकासाचे व्हिजन असणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. Vijaybabu is a multi-faceted personality with a vision of development who works tirelessly.

मागील 25 वर्षांपासून विविध सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, धार्मिक, खेळ, कला, पर्यावरण, शिक्षण, महिला सक्षमीकरण इत्यादी क्षेत्रांत विविध उपक्रम भव्य दिव्य पद्धतीने राबवले आहेत. वर्षभर सामाजिक उपक्रम सुरु असलेले ते वणी विधानसभा क्षेत्रातील एकमेव नेते आहेत. समाजकारणासोबतच राजकारणातदेखील त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.

विजयबाबू चोरडिया यांचे प्राथमिक शिक्षण अमरावतीला झाले. माध्यमिक व ज्युनियर कॉलेजचे शिक्षण वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात झाले. महाविद्यालयीन काळात ते विद्यार्थी चळवळीशी जुळले. युवा अवस्थेतच त्यांना राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळाली. कॉलेजमध्ये असताना विद्यापिठाच्या निवडणुकीत भाग घेतला आणि इथूनच त्यांचा राजकारणात प्रवेश झाला.

Img 20250103 Wa0009

समाजसेवेचा उचलला वसा
वणी विधानसभा क्षेत्रातील अधिकाधिक भाग हा आदिवासी बहुल आहे. आर्थिक अडचण व गरीबी यामुळे अनेकांना उपचारांपासून वंचित राहावे लागत होते. ही गरज ओळखून त्यांनी आजपर्यंत अगणित आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. यातील शेकडो क्रिटीकल रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी घेतली. तसेच त्यांच्या सहकार्याने हजारो गोरगरीब रुग्णांच्या डोळ्यांचे मोफत ऑपरेशन करण्यात आले आहे. शेकडो अपंगांना व्हिलचेअर वाटप केले. हजारो होतकरू गरजू विद्यार्थ्यांना आजपर्यंत त्यांनी शिक्षणासाठी मदत केली. वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांत त्यांच्या मदतीने वाचनालय व अभ्यासिका सुरु झाल्यात. नगर पालिकेच्या शाळा दत्तक घेऊन या शाळेला व विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत केली आहे. झरी हा आदिवासी बहुल तालुका असून येथे आरएसएसची नीड ही संस्था काम करते. या संस्थेच्या माध्यमातून या भागातील 611 आदिवासी विद्यार्थी त्यांनी दत्तक घेतले आहे.
(रोखठोक परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा)