Home Breaking News धक्कादायक…..दिलीप कोरपेनवार यांचे अपघाती निधन

धक्कादायक…..दिलीप कोरपेनवार यांचे अपघाती निधन

● टँकर-पिकअपचा भीषण अपघात, एक नि:स्वार्थी शिक्षक, समाजसेवक काळाच्या पडद्याआड...

C1 20250720 09422825

टँकर-पिकअपचा भीषण अपघात, एक नि:स्वार्थी शिक्षक, समाजसेवक काळाच्या पडद्याआड…

Sad News :
वणीतील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 8 चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेले दिलीप नारायणराव कोरपेनवार (57) रा. रविनगर वणी यांचे रविवार दिनांक 20 जुलैला पहाटे वरोरा-चिमूर रोडवरील रान तळोदी शिवारात अपघाती निधन झाले. Shocking…..Dileep Korpenwar’s accidental death

ते पहाटे साडेचारच्या सुमारास चिमूर येथे कामानिमित्त मालवाहू पिकअप वाहन क्रमांक MH-49-D-4431 ने जात होते. त्याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकर क्रमांक MH-34-BJ- 6445 ने जबर धडक दिली. ही धडक पॅसेंजर साईडला असल्याने त्यांना डोक्याला गंभीर इजा झाली. घटनास्थळी जखमी झालेल्या कोरपेनवार यांना तात्काळ वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अपघाताच्या वेळी पिकअपमध्ये ते स्वतः, चालक व क्लिनर असे तिघे उपस्थित होते. चालक व क्लिनर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, ही दुःखद वार्ता वणीत वाऱ्यासारखी पसरली. शिक्षण, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी वरोरा येथे धाव घेतली.

Img 20250103 Wa0009

कोरपेनवार सर हे केवळ शिक्षक नव्हते तर एक सद्भावनेचे प्रतीक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वणी परिसरात हजारो वृक्ष लागवड करण्यात आली. अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांचे ते पालकत्व स्विकारत असत. नगर सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सामाजिक उपक्रमात पुढाकार घेतला होता. शिक्षणाविषयी त्यांची आस्था व कार्यशैली प्रेरणादायक होती. त्यांच्या अपघाती निधनामुळे वणीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
       (रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)

Previous articleमनसेचे फाल्गुन गोहोकार यांना मातृशोक
Next articleदुःखद … हाजी शरीफ खान यांचे निधन
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.