Home Breaking News अखेर.. वणीची जागा शिवसेना उबाठा पक्षाला….!

अखेर.. वणीची जागा शिवसेना उबाठा पक्षाला….!

● कॉग्रेस मधील संभाव्य उमेदवारांचे स्वप्नभंग

9059
C1 20240927 16584888

कॉग्रेस मधील संभाव्य उमेदवारांचे स्वप्नभंग

Political News |- Sunil Naik Patil : महाविकास आघाडीत वणी विधानसभेची जागा कॉग्रेस की शिवसेना (उबाठा) यापैकी कोणाला सुटणार याकडे दोन्‍ही पक्षातील कार्यकर्त्‍यांचे लक्ष लागले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॉग्रेस पक्षाच्‍या वरिष्‍ठ नेत्‍याने आपल्‍या निवासस्‍थानी समर्थकांची बैठक घेत वणीची जागा शिवसेना (उबाठा) पक्षाला सुटल्‍याचे स्‍पष्‍ट केले. या वार्तेने कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हवालदिल झाल्याचे दिसून येत असून संभाव्य उमेदवारांचे स्वप्नभंग झाले आहे. Congress or Shiv Sena UBT for Wani Vidhan Sabha seat in Mahavikas Aghadi

Img 20250422 wa0027

विधानसभेच्‍या निवडणुकीकरीता सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहे. महाविकास आघाडी महायुतीला टक्‍कर देण्‍याकरीता सज्‍ज झालेली असतांनाच जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल असे दिसत आहे. महाविकास आघाडी व महायुतीत घटक पक्षाचे नेते मॅरेथॉन चर्चा करतांना दिसत आहे. काही जागांवर तिढा असला तरी संगनमतांने तो सोडविण्‍यात येईल असे चिञ आज निर्माण झाले आहे.

Img 20250103 Wa0009

वणी विधानसभेकरीता कॉग्रेस व शिवसेना (उबाठा) या दोन्‍ही पक्षांनी दावा केला होता. कॉग्रेस पक्षाने निवडणुकीची जय्यत तयारी सुध्‍दा केली होती. उमेदवारी मिळावी याकरीता अनेकांनी पक्षश्रेष्‍ठींकडे दावेदारी केली होती. विविध याञा आणि अनेकानेक सर्वसमावेशक उपक्रम यामुळे मतदारसंघ ढवळुन निघाला होता. कॉग्रेस पक्षातील त्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांच्‍या खुलाशाने माञ कार्यकर्त्‍यांतील उत्साह झटक्यात मावळला आहे.

वणी विधानसभेची जागा शिवसेना (उबाठा) पक्षाला सुटल्‍यास कोण उमेदवार असेल याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्‍ठी घेणार आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाकडून माजी आमदार विश्वास नांदेकर, उप जिल्हाप्रमुख संजय निखाडे व विधानसभा प्रमुख संजय देरकर हे प्रमुख दावेदार आहेत. मात्र त्यांच्यात समन्वय तथा एकवाक्‍यता नसल्‍याने जिल्ह्याचे नेते खा. संजय देशमुख वणी येथे येणार असुन पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मते जाणुन घेणार आहेत आणि त्‍यानंतरच पक्षश्रेष्‍ठीं उमेदवारांबाबतचा निर्णय घेणार असल्‍याचे सुञांनी सांगीतले आहे.
Rokhthok News