Home Breaking News प्रशासन निगरगट्ट, संजय खाडे यांचे धरणे आंदोलन

प्रशासन निगरगट्ट, संजय खाडे यांचे धरणे आंदोलन

● सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी लढा ● तहसील कार्यालयासमोर ठिय्या

410
C1 20241015 13062345
Img 20241016 Wa0023

सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी लढा
तहसील कार्यालयासमोर ठिय्या

Political News | शासन आणि प्रशासन निगरगट्ट झाले आहेत. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाचे त्यांना काहीही सोयरसुतक नाही. शेतकरी, कष्टकरी, महीला, युवा, निराधार अनेकानेक समस्येने ग्रासले आहेत. येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी अकरा वाजतापासून शेतकरी व वणी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांबाबत वणी विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. Sanjay Khade’s dharna movement to keep the administration on edge

वणी विधानसभेतील शेतकरी, कष्टकरी, महीला, युवा यांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. या प्रश्नांवर अनेकदा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मात्र जनतेच्या समस्येचे कोणतेही सोयरसुतक नसलेल्या लोकप्रतिनिधी, प्रशासनाने याकडे कायम दुर्लक्ष केले आहे. समस्यांची सोडवणूक व्हावी याकरिता हे धरणे आंदोलन करण्यात आल्याचे खाडे यांनी स्पष्ट केले आहे.

आंदोलनस्थळी मोठया प्रमाणात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सत्ताधाऱ्यावर सडकून टीका करण्यात आली. आंदोलन सुरू असताना मतदारसंघातील दोन वृद्ध निराधार महिलेंनी लाडकी बहीण योजनेमुळे निराधार योजनेचे पैसे मिळालेच नाही अशी व्यथा मांडली तर आता जगायचे कसे असा प्रश्न उपस्थित केला.

यावेळी निराधार लाभार्थ्यांचे रखडलेले पैसे त्वरित जमा करावेत. कापसासाठी ₹10000 व सोयाबीनसाठी ₹9000 भाव द्यावा. घरकुल योजनेचे प्रलंबित हफ्ते तत्काळ जमा करण्यात यावेत. वन्यप्राण्यांमुळे पिकांच्या नुकसानीचे दावे त्वरित मंजूर करावेत. जंगली जनावरांच्या समस्येचां कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यात यावा, जंगल आणि शेतकऱ्यांच्या शेतांभोवती पक्के कंपाऊंड बांधले जावे, जंगली जनावरांमुळे होणारे नुकसान पिक विमा योजनेत समाविष्ट करावे. शेतकऱ्यांना दिवसा 12 तास नियमित वीज पुरवठा करावा. पीक विम्याचे प्रलंबित दावे त्वरित मार्गी लावावेत. शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी. PM किसान सन्मान निधी योजने मध्ये 2019 नंतर सातबारावर फेरफार झालेल्या शेतकऱ्यांना अपात्र करण्याची अट रद्द करावी. वणी शहरात स्वच्छ पाण्याचा पुरवठा, गटारींची नियमित साफसफाई, आणि रोगराई नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात अशा प्रमुख मागण्या शासन दरबारी रेटून धरल्या.
Rokhthok News