● निवडणूक जिंकायचीच, भाजपची रणनीती
Political News | विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आदर्श आचारसंहिता लागून दोन दिवस झालेत. महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. उमेदवारांची यादी दोन दिवसात अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांना “डच्चू” देण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली असून यात संदीप धुर्वे, नामदेव ससाणे व मदन येरावार यांचा समावेश असल्याचे बोलल्या जात आहे. BJP will rotate bhakri, three MLAs “Dachhu”!

भारतीय जनता पक्ष ताकही फुंकून पिताहेत. लोकसभेत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महायुती सज्ज झाली आहे. विद्यमान अमदारांपैकी 30 टक्के आमदारांना डच्चू देण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये जिल्ह्यातील तीन आमदार “डेंजर झोन” मध्ये तर दोघे सेफ असल्याचे समजते.
यवतमाळ जिल्ह्यात मागील निवडणुकीत भाजपचे पाच आमदार निवडून आले होते. यामध्ये मदन येरावार- यवतमाळ, संजीवरेड्डी बोदकुरवार- वणी, संदीप धुर्वे- आर्णी-केळापूर, अशोक उईके- राळेगाव तर नामदेव ससाणे- उमरखेड हे होते. या निवडणुकीत ससाणे व धुर्वे यांना विश्रांती देवून नवख्याना संधी देण्यात येणार असल्याचे समजते. तर येरावार यांच्या मतदारसंघात उमेदवारीसाठी माजी जिल्हाध्यक्ष व माजी जिप सदस्या यांनी दावेदारी केल्याने इलेक्टिव्ह मेरिट तपासून पक्षश्रेष्ठीं निर्णय घेणार आहेत.
मदन येरावार यांच्याबाबत पक्षात नकारात्मकता नाही परंतु 2014 व 2019 मध्ये मिळालेला निसटता विजय. तर लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेले अल्पसे का होईना मताधिक्य, हे बघता पक्ष शेवटच्या क्षणी कोणता निर्णय घेणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. येरावार यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे. तसेच “इलेक्शन मॅनेजमेंट” मध्ये ते पटाईत आहेत यामुळे त्यांना पुन्हा चान्स मिळेल का हे लवकरच कळणार आहे.
Rokhthok News