Home Breaking News सिलेंडरचा स्फोट, जीवितहानी टळली

सिलेंडरचा स्फोट, जीवितहानी टळली

● तीन ते चार लाखाचे नुकसान

671
C1 20241109 17474535

तीन ते चार लाखाचे नुकसान

Sad News | मारेगाव तालुक्यातील गाडेगाव येथे शनिवारी सकाळी साडे आठ वाजताच्या दरम्यान गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात घरगुती साहित्यासह घरात ठेवलेली रोकड जाळून खाक झाली. घरात कोणीच नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र संबधीत गॅस कंपनी धारकाने फुटलेले सिलेंडर व रेग्युलेटर नेले परंतु कोणताही विमा क्लेम करण्याचे आश्वासन दिले नाही. Fortunately, there was no one in the house and no one was killed.

Img 20250422 wa0027

भारत दाते हे आपल्या परिवारासह गाडेगाव येथे वास्तव्यास आहेत. सकाळी चहा पाणी झाल्यानंतर ते आपापल्या कामात व्यस्त असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. काही कळण्याच्या आत संपूर्ण घराला आगीने विळखा घातला.घरातील महत्वाचे साहित्य भस्मसात झाले. तर घरात ठेवलेली रोकड जाळून खाक झाली. या घटनेत तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलल्याजात आहे.

Img 20250103 Wa0009

घटना घडताच इंडेन गॅस चे मरेगाव येथील वितरक याचे कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी रेग्युलेटर व सिलेंडर ताब्यात घेतले आणि रवाना झाले. परंतु दाते यांना कोणतीही विमा क्लेम अथवा भरपाई बाबत माहिती दिली नाही. यामुळे ज्या गरीब परिवाराचे नुकसान झाले त्यांच्या भावना संतप्त झालेल्या आहेत.

गॅस कंपनी विरोधात शिवसेना उबाठा आक्रमक
गाडेगाव येथील गरीब परिवाराला सिलेंडर स्फोटामुळे वित्तीय हानी सहन करावी लागत आहे. सुदैवाने जीवितहानी टळली. कोणताही पंचनामा न करता रेग्युलेटर व सिलेंडर संबंधित वितारकाने नेले. तात्काळ त्या परिवाराला आर्थिक मदत व झालेली नुकसान भरपाई द्यावी अन्यथा वितरण परवाना रद्द व्हावा यासाठी शिवसेना उबाठा तीव्र आंदोलन छेडेल.
संजय निखाडे
उपजिल्हा प्रमुख, शिवसेना उबाठा