Home Breaking News कुणबी पदाधिकाऱ्यांनीच उचलले बोदकुरवारांच्या प्रचाराचे “शिवधनुष्य”

कुणबी पदाधिकाऱ्यांनीच उचलले बोदकुरवारांच्या प्रचाराचे “शिवधनुष्य”

● तिन्ही तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

C1 20241113 05550305

तिन्ही तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

Political News | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. प्रमुख उमेदवारांनी प्रचार यंत्रणेत चुरस निर्माण केली आहे. तर संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचाराचे शिवधनुष्य कुणबी पदाधिकाऱ्यांनीच उचलल्याचे दिसत असून पक्षाचे सर्वच प्रमुख कार्यकर्ते तथा पदाधिकारी झपटल्यागत प्रचारात गुंतले आहे. Sanjeev Reddy Bodkurwar campaign “shivdhanushya” was picked up by the Kunbi office bearers

भारतीय जनता पक्षातील कुणबी पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखत होत असलेल्या “फेक नरेटिव्ह” विरोधात कंबर कसली आहे. पक्षाची ध्येय धोरणे शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दिसत आहे. यात प्रामुख्याने दिनकर पावडे, विजय पिदूरकर, संजय पिंपळशेंडे, गजानन विधाते, विजय गारघाटे, सचिन खाडे, नितीन वासेकर, दीपक मत्ते या वणी तालुक्यातील कुणबी पदाधिकाऱ्यांनी प्रचाराचे शिवधनुष्य उचलले आहे तर मारेगाव व झरीतील कुणबी समाजाचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रचार यंत्रणेत हिरीरीने सहभागी होताहेत.

विधानसभा मतदारसंघातील मारेगांव तालुक्यात संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा मांगरुळ,कोलगावं, वेगावं, केगावं, गोधनी, मारेगावं शहर, करणवाडी, बुरांडा, हटवांजरी, भूर्कीपोड येथे झंझावाती प्रचार दौरा झाला. यावेळी भाजपचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी जनतेला पक्षाच्या ध्येय-धोरणांची माहिती दिली आणि मतदारांशी संवाद साधला.

Img 20250103 Wa0009

मतदारसंघात होत असलेल्या दौऱ्यात स्थानिक विकास, रोजगारनिर्मिती आणि भाजपा – महायुती सरकारने जनसामन्याच्या फायद्यासाठी केलेली अनेक लोकोपयोगी विकासकामे व राबविलेल्या अनेक जनकल्याणकारी योजनेची माहिती दिली. याप्रसंगी बोदकुरवार यांनी विविध मंदिर देवस्थानं येथे भेट देत देवी-देवतांचे दर्शन घेतले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, क्रांतिवीर बिरसामुंडा, क्रांतिवीर शामादादा कोलाम यांना अभिवादन केले.

यावेळी मारेगाव भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश लांबट,भाजपा जिल्हा अध्यक्ष किसान मोर्चा शंकर लालसरे, शिवसेना शिंदे गट तालुकाध्यक्ष विशाल कीन्हेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दयाल रोगे, माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, प्रशांत नांदे, रमन डोये, शालीनीताई दारूंडे, गणपत वराटे, गणेश झाडे,पवन ढवस, लीलाधर काळे, अनूप महाकूलकर, वैभव पवार, राहूल राठोड, डोमाजी भादीकर, सुशीला भादीकर, दादाराव ढोबरे व महायुती चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Rokhthok News