Home Breaking News आकाशाचा कहर : वीज कोसळून एक गतप्राण

आकाशाचा कहर : वीज कोसळून एक गतप्राण

● मारेगाव तालुक्यातील दुर्दैवी घटना

C1 20250806 20084616

मारेगाव तालुक्यातील दुर्दैवी घटना

Sad News :
तालुक्यातील पांढरकवडा (लहान) शिवारात बुधवारी दुपारी आकाशातून कोसळलेल्या विजेने एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Sky chaos: One dies after being struck by lightning

अनिल रमेश फरताडे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, तो पिसगाव येथील निवासी आहे. तो मागील अनेक वर्षांपासून ठेक्यावर शेती करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. दोन वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या अनिलवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती.

IMG 20260511 WA0005

घटनेच्या दिवशी, दि. 6 ऑगस्ट रोजी, दुपारी सुमारास अनिल शेतात नेहमीप्रमाणे शेतीकाम करत होता. दरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन तुरळक पाऊस व विजांचा कडकडाट सुरू झाला. याचवेळी अनिल याच्यावर आकाशातून वीज कोसळली आणि तो जागीच गतप्राण झाला.

Img 20250103 Wa0009

या अपघातामुळे फरताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मृताच्या पश्चात आई, पत्नी, दोन वर्षांची मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे. या अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी धाव घेतली व प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ROKHTHOK