Home Breaking News चुरशीच्या लढतीत कोण ठरणार बाजीगर

चुरशीच्या लढतीत कोण ठरणार बाजीगर

● मतदारसंघात उत्‍सुकता पोहचली शिगेला

558
C1 20241119 09180567

मतदारसंघात उत्‍सुकता पोहचली शिगेला

Political News | विधानसभा निवडणुकीच्‍या आखाडयात दिग्गज नेत्‍यांनी दंड थोपटले. तगड्या उमेदवारांनी निवडणुक अस्‍तीत्‍वाची केली. शक्‍तीप्रदर्शन, रॅलींनी राजकीय वातावरण ढवळुन निघाले. प्रचाराचा कालावधी संपला आता मूक प्रचार आणि रणनीती आखण्याचा शेवटचा दिवस तर उद्या लोकशाहीचा उत्सव. चौरंगी चुरशीच्या लढतीत कोण असेल बाजीगर हे बघणे औत्सुक्याचे ठरणार असून मतदारसंघात उत्‍सुकता शिगेला पोहचली आहे. Who will be the winner in the tough fight ?

विधानसभेची निवडणूक अतिशय रंगतदार व चुरशीची झाली. आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी, एकमेकांची उनीदुनी काढून कार्यकर्त्यांत जोश निर्माण करण्यात उमेदवार यशस्वी ठरले. फेक नरेटिव्ह, विकासाचा अजेंडा, वचननामा, जाहीरनामा ही निवडणुकीची रणनीती असली तरी शहरी व ग्रामीण भागातील मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न चारही उमेदवारांनी प्रामाणिकपणे केला.

वणी मतदारसंघ मागील दहा वर्षांपासुन भाजपाचा बालेकिल्‍ला राहीला आहे. सलग दोनवेळा आमदार राहिलेल्या संजिवरेडडी बोदकुरवार यांनी हॅट्रीक पुर्ण करण्‍यासाठी मतदारसंघात प्रचारयंत्रणा शिस्तबद्ध राबवली. दहावर्षात केलेली विकासकामे, मतदारसंघात कोट्यवधी रुपयांच्या राबवलेल्या महत्वकांक्षी योजना आणि पुढील “व्हिजन” मतदारांसमोर ठेवले आहे.

मविआचे उमेदवार संजय देरकर संयमी व मितभाषी आहेत मात्र त्यांचा पक्ष कमालीचा आक्रमक आहे. शिवसेना उबाठा च्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी मतदारसंघात उत्स्फूर्त व तडफेने प्रचार यंत्रणा राबवली. आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस चे माजी आमदार वामनराव कासवार यांच्या नेतृत्वात काँग्रेसची संपूर्ण कार्यकर्त्यांची फळी देरकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.

कामाचा माणूस म्हणून प्रचंड ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे राजू उंबरकर यांनी महायुती व मविआ समोर कडवे आव्हान उभे केले आहे. राज ठाकरेंची सभा, कार्यकर्त्यांचा जोश, मतदारसंघात विविध समाज, संघटनांचा मिळणारा पाठिंबा, मतदाराचे प्रेम ह्या जमेच्या बाजू आहेत. त्यातच शेतकरी, महिला- भगिनी, आपत्तीग्रस्त, पीडित, विद्यार्थी व रुग्ण यांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असल्याने “आमदार बनवू कामाचा माणूस राजू उंबरकर” असे बोलल्या जात आहे.

मविआत वणी विधानसभेची जागा घटक पक्षाला सुटली. यामुळे काँग्रेसचे प्रबळ दावेदार असलेले संजय खाडे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. त्यांना शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर व काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेंद्र पाटील ठाकरे यांनी खंबीर साथ दिली. या दोन्ही नेत्यांचा मतदारसंघात असलेला जनाधार तसेच तीस वर्षांपासून काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ असलेले संजय खाडे या “त्रिमूर्ती”नी मतदारसंघात झंझावात निर्माण केला यामुळे त्यांची बाजू भक्कम झाली आहे.

वणी मतदारसंघात भाजप, शिवसेना, मनसे व काँग्रेसची पूर्वापार ताकद आहे. महायुती चे संजीवरेड्डी बोदकुरवार, मविआ चे संजय देरकर, मनसेचे राजू उंबरकर व अपक्ष संजय खाडे हे चार ही उमेदवार “टफ” आहेत. कोणाचा प्रभाव किती आहे हे ओळखणे कठीण आहे. प्रत्येक पक्षाचा जनाधार मतदारसंघात आहे. मतविभाजनाचा लाभ कोणाला होणार व फटका कोणाला बसणार हे मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे.
ROKHTHOK NEWS

Previous articleकुनबी व लोहार समाज उंबरकरांच्‍या पाठीशी
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.