Home Breaking News विद्यार्थी सुरक्षितता हिताचा विचार व आवश्यकता

विद्यार्थी सुरक्षितता हिताचा विचार व आवश्यकता

● रेझिंग डे निमित्त लायन्स मधे कार्यशाळा

78
C1 20250111 12085372

रेझिंग डे निमित्त लायन्स मधे कार्यशाळा

Wani News | लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे ‘महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे’ निमित्त वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी व लायन्स स्कूल च्या वतीने रस्ते वाहतूक, सुरक्षा व वाहतूक नियमावली या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. Consideration and requirement of student safety interests

Img 20250422 wa0027

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल चें उपाध्यक्ष बलदेव खूंगर होते. मार्गदर्शक म्हणुन सहायक पोलिस नियंत्रक वाहतूक शाखा वणी सिता वाघमारे व वाहतूक शिपाई रूपाली बदखल,शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे व प्राचार्य चित्रा देशपांडे उपस्थित होते.

Img 20250103 Wa0009

विद्यार्थी सुरक्षितता हिताचा विचार व आवश्यकता लक्षात घेवून उपाध्यक्ष खुंगर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम विद्यालयात राबविण्यात आला. यावेळी अठरा वर्षांवरील विद्यार्थ्यांना रस्ता वाहतूक करताना आवश्यक कागदपत्रे व लायसन्स तसेच अठरा वर्षांखालील विद्यार्थ्यांनी वाहन परवाण्याशिवाय चालवू नये असे आवाहन सिता वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच ‘गूड टच व बॅड टच’ व व्यसनांपासून दूर राहण्याची आवश्यकता विद्यार्थ्यांना उदाहरणे देऊन पटवून दिली. प्रास्ताविक  किरण बुजोणे यांनी केले तर आभार प्रा. चित्रा देशपांडे यानी मानले.
Rokhthok News