● विहिरीत उडी घेत संपवली जीवनयात्रा
Sad News | मारेगाव तालुक्यातील बुरांडा येथे 40 वर्षीय विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले. आजारपणाला कंटाळून मध्यरात्रीच्या सुमारास विहिरीत उडी घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. A married woman ended her life by jumping into a well
मंदा आनंद ताकसांडे (40) असे मृतक विवाहितेचे नाव आहे, ती आपल्या परिवारासह बुरांडा येथे वास्तव्यास होती. मागील काही वर्षांपासून ती कर्करोगाने ग्रस्त होती. तिला होत असलेला त्रास असह्य झाल्याने अखेर तिने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. कुटुंबातील सदस्यांनी सकाळी तिची शोधाशोध केली असता तिचा मृतदेह विहिरीत आढळून आला. मृतक महिलेच्या पश्चात मुलगा व मुलगी आहे.
Rokhthok News





