● सात सराईत चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
● वणी व शिरपूर येथील घटनेचा उलगडा
Crime News | स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी दणदणीत कारवाई (action of lcb) करत जिल्ह्यातील तब्बल 10 घरफोडी व एक चोरीच्या घटनेतील गुन्ह्याचा छडा लावला. यात 345 मिली ग्राम सोने व 200 मिली ग्राम चांदीचा ऐवज हस्तगत केले तर सात सराईत चोरटे व एक विधी संघर्षग्रस्त यांना ताब्यात घेतले आहे. action of lcb: 11 cases of burglary and theft revealed
यवतमाळ जिल्ह्यात घरफोडीचे घटनांमध्ये वाढ झाली होती. यवतमाळ येथील एस.बी.आय चौक परिसरात असलेल्या अपर्णा अपार्टमेंट मध्ये दिवसा ढवळया घरफोडीचा प्रकार झाला होता त्याच प्रमाणे पोलीस ठाणे वणी व शिरपुर येथे सुध्दा घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. तसेच दिग्रस येथील रोडा ज्वेलर्स या सराफा दुकानातुन अनोळखी महिलांनी हातचलाखीने सोन्याचा रानी हार लंपास केल्याची घटना घडली होती. घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशीत केले होते.

जिल्ह्यात घडलेल्या चोरी व घरफोडीच्या घटनेकडे विशेष लक्ष केंद्रित करत स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथक सतर्क झाले. खबरी नेटवर्क कार्यान्वित करत तांत्रिक बाबीचा अवलंब करून चोरट्यांचा माग शोधण्यात lcb पथकाला यश आले. विविध ठिकाणी झालेल्या चोरी व घरफोडी प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळत मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
रोशन उर्फ चिकन्या मोतीराम क्षिरसारगर रा. चिमुर जि. चंद्रपुर ह.मु. विश्वशांती नगर, यवतमाळ याला API संतोष मनवर व त्यांचे पथकाने ताब्यात घेत यवतमाळ शहरातील सात गुन्हे उघडकीस आणले. तर PSI धनराज हाके व त्यांचे पथकाने खबरी नेटवर्क चा अवलंब करत पंकज राजु गोंडाने (28) रा. चवरे नगर सुत गिरणी रोड अमरावती, सागर जनार्धन गोगटे (34) रा. गांधी चौक तुळजागीरवाला अमरावती ह.मु. यादगार नगर कारंजा, जि वाशिम या दोघांना ताब्यात घेत वणी व शिरपूर येथील घटनेचा उलगडा केला.
LCB पथकाचे API गजानन गजभारे व PSI शरद लोहकरे व त्यांचे पथकाने तांत्रीक विश्लेशनाचा आधार घेत दिग्रस येथील रोडा ज्वेलर्स या सराफा दुकानातील चोरीच्या घटनेचा पर्दाफाश केला. या प्रकरणी नंदा मच्छींद्र डुकले (22), रोहीत मच्छींद्र डुकले (22) हे दोघे रा. खवळवाडी पाचोड ता पैठण जि छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेउन त्यांचेकडे तपास केला असता त्यांचे साथीदार आरोपी शितल अजय पवार (27) रा. गेवराई जिल्हा बीड व एक विधीसंघर्षग्रस्त बालीका याना ताब्यात घेण्यात आले.
PSI गजानन राजमल्लु व त्यांचे पथकाने प्राप्त गोपणीय व तांत्रीक माहितीचे आधारे यवतमाळ शहरातील अपर्णा अपार्टमेंट मधील सदनिकेतील चोरीचा छडा लावला. या घटनेतील संशयित आरोपी रशिद शहा ऊर्फ तलवार सिंग हमीद शहा (49) रा. अकोला याला ताब्यात घेतले. ताब्यातील सर्व आरोपीकडून तब्बल 345 मिली ग्राम सोने व 200 मिली ग्राम चांदीचा ऐवज हस्तगत करण्यात आला तर आरोपींना संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुश जगताप, PI, LCB सतिश चवरे यांचे मार्गदर्शनात, API संतोष मनवर, API गजानन गजभारे, PSI धनराज हाके, गजानन राजमल्लु, शरद लोहकरे, योगेश गटलेवार, सैयद साजीद, बंडु डांगे, अजय डोळे, प्रशांत हेडाऊ, रितुराज मेढवे, निलेश राठोड, विनोद राठोड, आकाश सहारे, रुपेश पाली, योगेश डगवार, आकाश सुर्यवंशी, देवेंद्र होले, योगेश टेकाम. सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, उल्हास कुरकुटे, निलेश निमकर, सलमान शेख, रजनिकांत मडावी, नरेश राऊत, सतिश फुके, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, रमेश राठोड, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, सुनिल पंडागळे, कविश पाळेकर, व दिगांबर पिलावन यांनी पार पाडली.
ROKHTHOK NEWS






