Home Breaking News Be careful… कुलूपबंद घर चोरट्यांचे टार्गेट

Be careful… कुलूपबंद घर चोरट्यांचे टार्गेट

● रोकड आणि सोन्‍याचा ऐवज लंपास ● नागरीकांनी सावधानता बाळगण्‍याची गरज

C1 20250225 14384026

रोकड आणि सोन्‍याचा ऐवज लंपास
नागरीकांनी सावधानता बाळगण्‍याची गरज

Crime News | शहरात चोरटयांचा चांगलाच हैदोस सुरु आहे. कुलूपबंद घरांना टार्गेट करण्‍यात येत असुन नागरीकांनी सावधानता (Be careful) बाळगण्‍याची गरज निर्माण झाली आहे. उपचारार्थ बाहेरगांवी गेलेल्‍या चिखलगाव येथील साफल्यनगरात वास्‍तव्‍यास असलेल्‍या भारत वसंतराव ठाकरे (47) यांचे घरी चोरटयांनी डाव साधला. घरातील रोकड व सोने चांदीचा ऐवज लंपास करण्‍यात आल्‍याची घटना 23 फेब्रुवारीला उघडकीस आली. Locked houses are being targeted and citizens need to be careful.

भारत वसंतराव ठाकरे हे आपल्‍या परिवारांसह साफल्‍यनगर येथे राहतात. ते आजारी असल्‍यामुळे उपचारार्थ 15 फेब्रुवारीला चंद्रपुर येथे गेले होते. उपचार संपल्‍यानंतर ते 23 फेब्रुवारीला वणीला सकाळी परतले असता त्‍यांना घरात चोरटयांनी हात साफ केल्‍याचे निदर्शनांस आले. त्‍यांनी पाहणी केली असता रोकड व सोने चांदीचा ऐवज लंपास केल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्‍यांनी तातडीने पोलीसांना कळवले व रितसर तक्रार दाखल केली.

आलमारीमध्ये 50 हजाराची रोकड ठेवलेली होती,  तर 3 ग्रॅमची सोन्‍याची अंगठी, 6 ग्रॅम वजनाचे कानातले, 5 ग्रॅम वजनी सोन्‍याचा गोफ, चांदीचा चाळ असा एकुन 1 लाख 6 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्‍याचे तक्रारीत नमुद करण्‍यात आले. ठाकरे यांनी दिलेल्‍या तक्रारी त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात कलम  331(3), 331(4), 305(a) BNS अन्वये गुन्हे दाखल करण्‍यात आला असुन पुढील तपास API नीलेश अपसुंदे करत आहेत.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009