● नाभिक समाजाचा भव्यदिव्य उपक्रम
Wani News | महाराष्ट्र नाभिक महामंडळ वणी शाखेच्या वतीने उपवधु-वर परीचय सोहळा व राज्य स्तरीय नाभिक समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील शेतकरी मंदिरात शनिवार दिनांक 1 मार्चला आयोजित कार्यक्रमात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. Organization of State Level Nabhik Samaj Melava
आयोजित वधू वर परिचय मेळाव्यात अनेक सांस्कृतीक कार्यक्रमांसोबतच समाज भुषण, समाज गौरव, विशेष गौरव सम्मान, समाज विचार मंथन अशा विविध सामाजिक दायित्व असलेल्या कार्याला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

नाभिक समाज बांधवांनी मेळाव्यास सहपरिवार आपल्या उपवर- वधूंसह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष शशिकांत उर्फ डुड्डू नक्षीने, यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Rokhthok News






