● वणीत उष्माघाताने एकाचा मृत्यू
● नागरिकांनी सावधानता बाळगावी
Big News : विदर्भात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. 20 एप्रिल 2025 रोजीच्या तापमानविषयक निरीक्षणानुसार, चंद्रपूर 44.6 अंश सेल्सियस तापमानासह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना मागे टाकले आहे. गेल्या 24 तासांत चंद्रपूरमध्ये तापमानात 0.6 अंशांनी वाढ झाली असून, ते सरासरीपेक्षा 3.2 अंशांनी जास्त आहे. विदर्भात उष्णतेचा कहर बघायला मिळत असून नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे झाले आहे. Chandrapur has the highest temperature; Vidarbha heat havoc!

तापमानातील झपाट्याने होणारी वाढ नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. विशेषतः दुपारच्या सुमारास रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येतो. यामुळे आरोग्यविषयक खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत होत असले तरी वयोवृद्ध, लहान मुले व रस्त्यावर काम करणाऱ्यांना अधिक त्रास जाणवायला लागला आहे. वणी उपविभागात उष्माघाताने वृद्धाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सावधगिरीसाठी नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान बाहेर जाणे टाळावे, हलका व सूती कपड्यांचा वापर करावा, डोके व चेहरा झाकण्यासाठी स्कार्प, उष्णतेच्या झळा टाळण्यासाठी गॉगल वापरावा, भरपूर पाणी प्यावे, उष्णतेच्या लाटेचा प्रभाव काही दिवस जाणवेल. तरी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
Rokhthok News