Home Breaking News अपघातात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

अपघातात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

● अज्ञात वाहनाने दिली जबर धडक

C1 20250530 16512409

अज्ञात वाहनाने दिली जबर धडक

Sad News |
मारेगाव तालुक्यातील बोटोणी ते जळका रस्त्यावर शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास अज्ञात वाहनाने एका दुचाकीस्वाराला जबर धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रदीप गुणवंत राउत (40) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते आवळगाव येथील निवासी होते. A bicyclist was hit by an unknown vehicle, killing him on the spot.

प्रदीप राउत हे सकाळी आपल्या साळ्याला खंडणी येथे सोडण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. साळ्याला सोडून परत येत असताना बोटोणी-जळका दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर राऊत रस्त्यावर कोसळले आणि डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.

प्रदीप रस्त्यावर कोसळलेले पाहून काही नागरिकांनी तात्काळ मारेगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत राऊत यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Img 20250103 Wa0009

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रदीप राऊत यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.
Rokhthok News