● राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात शहरात ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष; मुसळधार पावसातही मराठी अभिमानाचा जागर!
Political News :
राज्य शासनाने मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयावरून काढलेल्या दोन्ही शासकीय आदेशांना अखेर मागे घेतले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठी अस्मितेच्या मुंबईत होऊ घातलेल्या मोर्चाच्या इशाऱ्यामुळे सरकारला झुकावे लागले. याच विजयाचा जल्लोष आज वणी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ‘मराठीचा विजय असो’च्या घोषणांनी करण्यात आला. MNS celebrates: Marathi’s struggle is a success! Hindi compulsion abolished
मुसळधार पावसालाही न जुमानता, मनसेचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पक्ष नेते राजू उंबरकर यांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ढोल-ताशांनी संपूर्ण परिसर मराठमोळ्या आवाजात निनादला.
राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीवर अविश्वास दाखवत, “कोणतीही समिती असो, महाराष्ट्रात हिंदी सक्ती मनसे चालू देणार नाही,” असे ठाम मत पक्षाने व्यक्त केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुद्द पत्रकार परिषद घेऊन निर्णय मागे घेतल्याची घोषणा केली.
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष अंकुश बोढे, मयुर गेडाम, अमोल मसेवार, मयुर घाटोळे, शंकर पिंपळकर, विलन बोदाडकर, अज्जू शेख, जितू शिरभाते, विठ्ठल हेपट, लक्की सोमकुंवर, हिरा गोहोकार, बंटी धानोरकर, राहुल देवनपल्लीवार, मयुर मेहता, कृष्णा कुकडेजा यांच्या सह असंख्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Rokhthok News






