● “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता – सेवा पंधरवडा”
● सामाजिक व आरोग्य उपक्रमांचा धडाका!
Political News :
जनसेवेचे व्रत स्वीकारलेल्या भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा सेवा कार्यांचा बिगुल वाजवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत वणी विधानसभा क्षेत्रात “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता – सेवा पंधरवडा” जोरदार उत्साहात साजरा होणार आहे. “From National Leader to Father of the Nation – Service Fortnight”
पत्रकार परिषदेत भाजपचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने घेतलेली झेप अधोरेखित करत सेवा पंधरवड्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय पिदूरकर, जिल्हा संयोजक संजय पिंपलशेंडे, जिल्हा उपाध्यक्ष कुणाल चोरडिया, शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवा पंधरवड्यातील ठळक उपक्रम
● महाआरोग्य शिबिर – 17 सप्टेंबर
बाजोरिया लॉन, वणी येथे नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व उपचार.
● नमो नेत्र संजीवनी – 20 सप्टेंबर
जैताई मंदिर येथे तज्ज्ञ नेत्रचिकित्सकांकडून डोळ्यांची तपासणी व उपचार.
● स्वच्छता अभियान – 21 सप्टेंबर
वणी बसस्थानक व ग्रामीण रुग्णालय परिसरात सकाळी 6 वाजता पासून सफाई मोहीम.
● आयुष्मान भारत कार्ड मोहीम – 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर, वणी शहरातील 14 प्रभागांमध्ये मोफत कार्ड वितरण.
● 25 सप्टेंबर : पं. दीनदयाल उपाध्याय यांची जयंती मतदारसंघातील प्रत्येक बूथवर साजरी करण्यात येणार आहे. तर आईच्या नावे एक वृक्ष ही मोहीम राबविण्यात येणार आहे. स्वदेशी वस्तू बाबत जनजागृती वोकल फॉर लोकल हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आणि भव्य कार्यकर्ता मेळावा एस. बी. हॉल, वणी येथे आयोजित करण्यात आला आहे.
● 2 ऑक्टोबर : सेवेचा समारोप महापुरुषांच्या मूर्तींची स्वच्छता, पुष्पांजली अर्पण व महात्मा गांधी- लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम असेल.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. समाजोपयोगी प्रत्येक उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, हीच खरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंदना आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन ठरेल असे आवाहन करण्यात आले आहे.
Rokhthok






