● “ठाकरे बंधूंची” तोफ आज धडाडणार
● वणीतील शेकडो महाराष्ट्र सैनिक मुंबईला रवाना
● ‘वरळी डोम’ बनणार मराठी अस्मितेचा रणसंग्राम!
Political News :
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या ऐतिहासिक क्षणाची वेळ आता समीप आली आहे. तब्बल 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहे. मराठी अस्मितेचा बुलंद आवाज वरळी डोममधून उसळणार असून ठाकरें बंधूची बुलंद तोफ महाराष्ट्रद्रोह्यांवर धडाडणार आहे. याप्रसंगी “आवाज मराठीचा” व्यासपीठाची पाहणी विदर्भातील मनसेचा झंझावाती नेता राजू उंबरकर यांनी केली. Voice of Marathi: Raju Umbarkar inspecting the Stage.
मुंबईतील ‘वरळी डोम’ मराठी अस्मितेचा रणसंग्राम बनणार आहे. राज्यभरातील मराठी प्रेमी मुंबईत दाखल झाले आहेत. विदर्भातील वणी विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला आहे. येथील शेकडो महाराष्ट्र सैनिक शिस्तबद्ध ताफ्यासह मुंबईत दाखल झाले आहेत.
“आवाज मराठीचा” या उद्घोषासह होणारा हा मेळावा राज्यातच नव्हे तर दिल्लीतही चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासात मोलाचा ठरणारा हा सुवर्णक्षण आहे. ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर एकत्र येत असून, मराठी अस्मिता, भूमिपुत्रांचा हक्क आणि महाराष्ट्रद्रोह्यांना जाब विचारण्यासाठी आज वरळी डोमवर धडकणार आहेत.
“आवाज मराठीचा” व्यासपीठावरून ठाकरेबंधू महाराष्ट्रद्रोह्यांना फटकारणार असून, मराठी मनाच्या भावना आणि भूमिपुत्रांच्या हक्कासाठी निर्णायक आवाज उठवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठी जनतेच्या भावनांना वाट मोकळी करून देणारा हा मेळावा अनेक राजकीय समीकरणांनाही कलाटणी देणार, हे निश्चित.
Rokhthok News






