● कुणाल चोरडिया यांच्या निवडीची चर्चा
Political News :
भाजपच्या स्थानिक राजकारणात सध्या ऍड. कुणाल चोरडिया यांच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाच्या दाव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. काही ठिकाणी लावण्यात आलेल्या त्यांच्या बॅनरवर जिल्हा उपाध्यक्ष असा उल्लेख आढळून आला. जिल्हा उपाध्यक्षपदाचा दावा खरा की खोटा हे कालांतराने स्पष्ट होईलच मात्र याप्रकरणी भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष म्हणतात, “अद्याप अधिकृत कार्यकारणी जाहीरच केलेली नाही.” In BJP’s local politics, Adv. Kunal Chordia’s claim for the post of district vice-president has sparked discussions.
कार्यकारणी जाहीर होण्याआधी पदाच्या दाव्याने प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न अति उत्साहाचं लक्षण मानलं जात आहे. ऍड. कुणाल चोरडिया हे सामाजिक उपक्रमांत नेहमीच अग्रेसर असून त्यांची पक्षनिष्ठा आणि कार्यक्षमता नाकारता येणार नाही. मात्र, कोणत्याही पदाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वी सार्वजनिक व्यासपीठावर पदाचा उल्लेख केल्यास पक्षशिस्तीला तडे जाऊ शकतो, असा मतप्रवाह काहींनी व्यक्त केला आहे.
या साऱ्या घडामोडींमध्ये आता भाजपचे जिल्हा नेतृत्व नेमकी भूमिका घेणार का, आणि चोरडिया यांना खरोखरच जिल्हा उपाध्यक्षपद मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत ही पदनियुक्ती केवळ अघोषितच ठरणार असे स्पष्ट दिसत आहेत.
अद्याप कार्यकारणीच जाहीर केली नाही
भारतीय जनता पक्षाची जिल्हा कार्यकारणी पंधरा ते वीस दिवसानंतर जाहीर करण्यात येणार आहे. ऍड. कुणाल चोरडिया यांनी बॅनर वर जिल्हा उपाध्यक्ष असे नमूद केल्याचे दिसून येत आहे. त्यांना जास्तच इंटरेस्ट असेल असे स्पष्ट मत जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल्ल चव्हाण यांनी व्यक्त केले.
Rokhthok News






