● गुरुंच्या आशीर्वादाने सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य…..
Wani News :
भारतीय जनता पार्टी वणी शहराच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त शहरातील मान्यवर गुरुजनांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमात गुरुवर्य संस्कृत पंडित स्वानंद पुंड, जैताई माता मंदिराचे प्रमुख माधव सरपटवार सर, प्रसिद्ध कीर्तनकार मुन्ना महाराज तुगनायत, योग शिक्षक महादेवराव खाडे यांची गुरुपूजा करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. Gratitude was expressed by performing Guru Puja.
तसेच प्रसिद्ध तबलावादक स्व. कुचनकार सर यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भारतीय जनता पार्टी वणी शहर अध्यक्ष ऍड. निलेश चौधरी, माजी नगरसेवक संतोष डंभारे, साखरकर सर, बालाजी भेढोडकर, हितेन अटारा, मयूर गोयनका व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

हा उपक्रम प्रदेशाध्यक्ष भाजपा रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाध्यक्ष प्रफुल भाऊ चव्हाण, यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आला. गुरुंच्या आशीर्वादाने सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यात पुढे जाण्याची प्रेरणा यावेळी मिळाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Rokhthok News






