Home Breaking News पंचायत समितीचा “वेल्हाळा” गण नकोच, ग्रामस्थांचा आक्षेप..!

पंचायत समितीचा “वेल्हाळा” गण नकोच, ग्रामस्थांचा आक्षेप..!

● ग्रामस्थांची तहसीलदारांकडे ठाम मागणी”

C1 20250717 21383213

ग्रामस्थांची तहसीलदारांकडे ठाम मागणी”

POLITICAL NEWS :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गणाचे नवे आराखडे जाहीर करण्यात आले असून, काही सर्कलच्या नावांवरून ग्रामस्थांमध्ये नाराजी दिसून येत आहे. अशाचप्रकारे “वेल्हाळा” नावाच्या गणाबाबत ग्रामस्थांनी आपला तीव्र आक्षेप नोंदवत तहसीलदार वणी यांच्याकडे साकडे घातले असून, सदर सर्कलचे नाव “लाठी” असे करण्याची मागणी केली आहे. Villagers object to Panchayat Samiti’s Velhala Gana

या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर यांनी तहसीलदार यांना निवेदन देत उचित कार्यवाही ची मागणी केली आहे. वेल्हाळा हे केवळ महसूल शिव असून, तेथे कोणतेही गाव, ग्रामपंचायत अथवा मतदान केंद्र अस्तित्वात नाही. त्यामुळे वेल्हाळा या नावाने पंचायत समितीचा प्रभाग ओळखणे ही लोकशाही प्रक्रियेच्या विरोधात असून, वस्तुस्थितीला छेद देणारी बाब असल्याचे स्पष्ट केले आहे.

भीषण…..बिअरबारचा वेटर रेल्वेखाली चिरडला

दरम्यान, लाठी ही ग्रामपंचायत या सर्कलमधील सर्वाधिक लोकसंख्या व मतदारसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे. शासकीय सुविधा, शाळा, अंगणवाडी, वसाहत व विविध सार्वजनिक संस्था येथे कार्यरत आहेत. त्यामुळे या प्रभागाचे खरे प्रतिनिधित्व “लाठी” ग्रामपंचायतच करते, असा युक्तिवाद ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे.

Img 20250103 Wa0009

वेल्हाळा नावामुळे संभ्रम निर्माण होतो, कारण प्रत्यक्षात वेल्हाळा नावाचे कोणतेही गाव अस्तित्वात नाही. त्यामुळे पारदर्शकता आणि स्थानिक ओळख हरवत आहे. यापूर्वी या सर्कलला “लाठी-लाडगुडा” असे नाव होते. आता नव्याने निर्माण झालेल्या गटाला “वेल्हाळा- नांदेपेरा” ऐवजी “लाठी- नांदेपेरा” असे नाव मिळावे, अशी नागरिकांची भावना आहे.

या सर्कलसाठी “लाठी” हे नावच योग्य असून, वेल्हाळा महसूल शिव असल्याने ते फक्त तांत्रिक नोंदापुरते मर्यादित राहावे, अशी ठाम भूमिका घेऊन नागरिकांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ROKHTHOK NEWS

Previous articleभीषण…..बिअरबारचा वेटर रेल्वेखाली चिरडला
Next articleदुःखद..आरतीने गळफास का घेतला….!
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.