Home Breaking News शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्त करा

शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्त करा

● पुरोगामी शिक्षक समितीची शिक्षण मंत्र्याकडे मागणी

20250813 152602
पुरोगामी शिक्षक समितीची शिक्षण मंत्र्याकडे मागणी

Educational news :
राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दादाजी भुसे यांच्या शैक्षणिक गुणवत्ता आढावा सभेच्या निमित्ताने महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षकांच्या समस्या मांडत निवेदन सादर केले. हे निवेदन राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांनी मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून दिले. Progressive Teachers’ Committee’s demand to the Education Minister

निवेदनात नमूद केले आहे की, जिल्हा परिषद व नगर परिषद शाळांतील शिक्षकांवर रोज नवनवीन अशैक्षणिक कामांचा बोजा वाढत असून, शिक्षणाच्या गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. विविध विभागांच्या लिंक भरणे, अॅप डाउनलोड करून माहिती-फोटो अपलोड करणे, तसेच निवडणूक आयोगाच्या बी.एल.ओ. कामांसाठी प्राधान्याने शिक्षकांची नेमणूक करणे, यामुळे शिक्षक त्रस्त झाले आहेत. अनेकांना त्यांच्या शाळेच्या गावापासून 10 ते 20 किमी अंतरावरील बूथवर मतदार नोंदणीचे काम दिले असून, एका शाळेतील अनेक शिक्षकांना एकाचवेळी अशा कामावर पाठविल्याने शाळा चालविण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

तसेच, नवीन संचमान्यतेमुळे शिक्षक संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, “वर्ग अनेक आणि शिक्षक एक” अशी स्थिती निर्माण झाली आहे. गरीब व ग्रामीण भागातील शिक्षण टिकवायचे असल्यास नवीन संचमान्यता धोरणाचा तातडीने फेरविचार करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

Img 20250103 Wa0009

या निवेदनावर राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्य कोषाध्यक्ष जी. एस. मंगनाळे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष राठोड, जिल्हा सरचिटणीस आनंदकुमार शेंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Rokhthok