Home Breaking News अबब…दहा वर्षात मतदारसंघासाठी 1733 कोटींचा निधी..!

अबब…दहा वर्षात मतदारसंघासाठी 1733 कोटींचा निधी..!

● अभूतपूर्व, विकास पर्व : विकासकामे आणि आमूलाग्र बदल, मात्र...

C1 20250925 08562013

अभूतपूर्व, विकास पर्व : विकासकामे आणि आमूलाग्र बदल, मात्र…

Political News :
यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघाने 2014 ते 2024 या दोन टर्म आमदारकीच्या कालावधीत अभूतपूर्व बदल अनुभवला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करताना माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या माध्यमातुन तब्बल साडे सतराशे कोटींचा घसघशीत निधी खेचून आणला. “न भूतो न भविष्यती” असा हा प्रवास अकल्पनिय आहे. 1733 crores fund for constituencies in ten years..!

माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात कधी नव्हे तो विकासाचा नवा अध्याय मतदारसंघाने अनुभवला आहे. बोदकुरवार यांनी लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करताना गावागावांत विकासाचा निधी येनकेन प्रकारे खेचून आणून जनतेच्या मूलभूत सुविधांकडे विशेषत्वाने लक्ष दिले.

माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी अवघ्या दहावर्षाच्या कालावधीत एकूण 1733.78 कोटी रुपये इतका विक्रमी निधी मतदारसंघात खेचून आणला. यात राज्य सरकार, जिल्हा परिषद, विविध योजना व केंद्रीय मार्ग निधीचा समावेश आहे.

Img 20250103 Wa0009

संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केलेली कामगिरी हा मतदारसंघासाठी खऱ्या अर्थाने ‘विकास पर्व’ ठरला आहे. शहरी व ग्रामीण भागाला समतोल निधी मिळवून दिल्याने प्रत्येक वर्गाच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे.

सेतुबंधन योजना अंतर्गत 200 कोटी रुपये, अर्थसंकल्पीय विकास कामे 250 कोटी रुपये, न्यायालय इमारत 65 कोटी, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 97.60 कोटी, CRIF योजनेतून रस्ते व स्ट्रीटलाईट्स 25 कोटी, पुलांची कामे 116.60 कोटी रुपये, शाळा, वसतिगृह, अंगणवाडी, पाणीपुरवठा व नाला बांधणीची कामे 156 कोटी रुपये, संस्कृती भवन, प्रशासकीय इमारती, बीएसएनएल कार्यालय नूतनीकरण 140 कोटी रुपये, अंतरित रस्ते, जिल्हा रस्ते व महत्त्वपूर्ण मार्ग सुधारणा – शेकडो कोटींची कामे सोबतच दलित वस्ती सुधारणा निधी, मातोश्री पांदन रस्ते, अशा प्रकारे सन 2014 ते 2019 पर्यंत 654.43 कोटी व 2019 ते 2024 पर्यंत 1079.35 कोटी रुपये असा एकूण 1733.78 कोटी रुपयांचा निधी मतदारसंघाच्या विकासासाठी खेचून आणला.

जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषद, आमदार निधी, खासदार निधी, मुख्यमंत्री योजना आणि केंद्रीय मार्ग निधी या सर्व पातळ्यांवरून सतत निधी खेचून आणण्याची बोदकुरवार यांची क्षमता स्पष्ट दिसून आली. ग्रामीण भागातील शेवटच्या वाड्या- वस्त्यांपर्यंत रस्ते, वीज, पाणी, शाळा, आरोग्य, सभागृहे पोहोचवण्याचे श्रेय त्यांना जाते.

त्यांनी खेचून आणलेला निधी फक्त आकड्यांतच मोठा नाही तर त्यातून प्रत्यक्ष कामे उभी राहिल्याने मतदारसंघात दृश्यमान बदल घडला आहे म्हणूनच तो दहा वर्षातील कालखंड वणी विधानसभा मतदारसंघासाठी खरे “विकास पर्व” ठरले…..मात्र……!
ROKHTHOK