● हृदय पिळवटून टाकणारी सुसाईड नोट
BIG NEWS :
मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या निर्णयामुळे मानसिक आघात सहन न झाल्याने अजय पुंडलीक शेंडे (30) रा. कायर, ता. वणी या विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षा सुनयना संजय येवतकर (अजात) यांनी जिल्हाधिकारी यांना बुधवारी निवेदन दिले. Maratha reservation decision victim! Married youth commits suicide

अजय शेंडे यांनी खाडे कृषी केंद्रातून खरेदी केलेल्या मोनोसिल 250 मि.ली. कीटकनाशक औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्याने आत्महत्येपूर्वी खरीदी पावतीच्या मागील बाजूस “ओबीसीतुन मराठा समाजाला आरक्षण दिल्या मुळे आत्महत्या करत आहे.” अशी सुसाईड नोट लिहून ठेवली.
घरातून निघून गेलेला अजय दिनांक 18 सप्टेंबर रोजी शिरपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता म्हणून नोंदवला गेला होता. अखेर 30 सप्टेंबर रोजी त्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेने संपूर्ण वणी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सदर तरुण हा गरीब कुटुंबातील होता. त्याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुली असा परिवार अडचणीत सापडला आहे.
या प्रकरणात सुनयना संजय येवतकर (अजात), अध्यक्षा, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, यवतमाळ यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देऊन पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत तसेच शासकीय नोकरीत संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच हा प्रकार म्हणजे आरक्षणाच्या अन्यायकारक निर्णयामुळे समाजातील तरुणाईत वाढत चाललेली असंतोषाची ठिणगी असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी सुधा खडके, शीतल धावडे, सुषमा बर्डे, कांता लाहे, मालती गावंडे, अबोली देशमुख, मनोज भबुतकर, उत्तम खंडारे, कविता पांढरकर, राजेंद्र मांदाडे, सविता कावलकर, सुषमा बनकर, कविता कठाळे, मृणाल पाखोडे, करुणा भबुतकर, सुषमा मेर्डे, वैष्णवी पुसदकर, वैशाली भोयर, सपना धावडे, दीपाली चौधरी, शिल्पा सुर्यकार उपस्थित होत्या.
ROKHTHOK






