● कुटुंबीय व मित्रपरिवारात पसरली शोककळा
Sad News :
रंगनाथ नगर येथील रहिवासी राखी सचिन लोहकरे (38) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे दिवंगत कर्मचारी त्र्यंबक वितोंडे यांच्या कन्या होत्या. नागपूर येथे उपचारादरम्यान बुधवार दिनांक 1 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Rakhi Lohkare passes away after a prolonged illness
मृत्यूदुखाने कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवारात शोककळा पसरली असून वणीतील मोक्षधाम येथे गुरुवारी, सकाळी दहा वाजता त्यांचा अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलं व आई असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Rokhthok






