● विकासाच्या गाडीची शांत, संयमी ड्रायव्हर
● भाजपच्या शिस्तबद्ध प्रचार यंत्रणेचे फलित
वणी | नगराध्यक्ष पदासाठी होत असलेल्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भारतीय जनता पक्षाच्या विद्याविभूषित विद्या खेमराज आत्राम मतदारांची पहिली पसंती ठरताहेत. भाजपने दहा वर्षांत केलेल्या विकास कामांचा ठोस दाखला देत, विविध प्रभागमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न आणि मतदार राजांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळेच शहरात भाजपाची लाट उसळली आहे. Vidya Atram, the well-educated, is becoming the first choice of voters
गृहभेटींपासून कॉर्नर सभांपर्यंत सर्वच आघाड्यांवर भाजपने जोरदार प्रचार केला आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण कायम राहिले असून अंतिम टप्प्यात निवडणूक एकतर्फी झाल्याचे चित्र आहे. नियोजनबद्ध प्रचार यंत्रणाच्या प्रभावामुळे सौ. आत्राम यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्वच उमेदवारांची स्थिती बळकट झाली असून विजयाकडे वाटचाल सुरु आहे.
संपूर्ण प्रचार काळात भाजपने ‘प्रत्येक घर, प्रत्येक मतदार’ या लक्ष्यावर काटेकोर नियोजन केले. अनुभवी पदाधिकाऱ्यांची प्रभागनिहाय जबाबदारी निश्चित केली. त्यांना सहकारी व स्थानिक कार्यकर्त्यांची साथ लाभली. ज्या प्रभागात अतितटीची लढत आहे, तेथे विशेष प्रयत्न करण्यात आले.
रोज सकाळी बैठका, त्यानंतर अनुशासनबद्ध मोर्चे, कॉर्नर सभा यामुळे प्रचाराचे मजबूत जाळे उभे राहिले. शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी संपूर्ण निवडणुकीचे उत्कृष्ट व्यवस्थापन केले तर आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या कणखर नेतृत्त्वात प्रचाराला वेग आला. पक्षाचे पदाधिकारी, नेते संपूर्ण कालावधीत प्रामाणिकपणे कार्यरत होते. विविध सेलचे पदाधिकारी पायाला भिंगरी बांधून फिरत असल्याचे दृश्य सर्वत्र दिसले.
वणी शहराच्या विकासाचा महत्त्वाचा निर्णय आता मतदारांच्या हातात असून, विधानसभेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी मतदारराजा सोडणार नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मतदारांना शहराचा सर्वांगीण विकास हवा आहे. स्थानिक पातळीवरील निवडणुकीत विकासाचा मुद्दा अतिमहत्त्वाचा असतो हे मतदारांना कळतो. यामुळेच भाजपची एकहाती सत्ता येणार हे भाकीत करायला भविष्यवेत्त्याची गरज नाही
Rokhthok






