Home Breaking News कारवाईचा बडगा.. तरी अवैधधंदे बिनधास्त सुरूच

कारवाईचा बडगा.. तरी अवैधधंदे बिनधास्त सुरूच

● श्रीराम नवमी उत्सव समिती आक्रमक ● स्वाक्षरी मोहीम, SP ना देणार निवेदन

C1 20250105 09561446

श्रीराम नवमी उत्सव समिती आक्रमक
स्वाक्षरी मोहीम, SP ना देणार निवेदन

Wani News | तालुक्यातील अवैधधंदे तसेच अवैध वाहतुक बंद करावी याकरीता प्रभु श्रीराम नवमी उत्सव समिती आक्रमक झाली आहे. स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत असून जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे. वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला असला तरी तालुक्यातील अवैध धंदे बिनधास्त सुरु आहे. A signature campaign is being conducted and a statement will be given to the District Superintendent of Police.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, ग्रामीण भागात दारूचे वितरण, कोंबडबाजार, झंडीमुंडी, चेंगड, कोळसा तस्करी, रेती तस्करी, मादक पदार्थाची रेलचेल या सारखे अवैधधंदे बिनधास्त सुरु आहे. त्या प्रमाणेच चोरी, घरफोडी, भंगार चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. पोलीस प्रशासन सुस्तावल्याचे दिसत असून कायदा व सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

वणी शहरात अवैध प्रवासी वाहतुक, बेशिस्त वाहन चालक, धूमस्टाईल बायकर्स, अल्पवयीन भरधाव दुचाकी हाकत असल्याचे चित्र, ऑटो चालकाची अरेरावी, प्रवासी खेचण्याचा नादात अस्तव्यस्त वाहतूक प्रत्यक्ष नागरीकांना अनुभवावी लागत आहे. प्रभु श्रीराम नवमी उत्सव समितीने आक्रमक भूमिका घेतल्याने काही प्रमाणात वाहतूक शाखेने बडगा उगारला मात्र समूळ उच्चाटन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Img 20250103 Wa0009

पोलीस प्रशासनाने अवैध धंद्याला पुर्णतः मोकळीक दिल्याने अवैध धंदे चांगलेच बहरले आहे. खुलेआम चेंगड, झंडीमुंडी सुरु असल्याचे वास्तव sdpo च्या पथकाने केलेल्या कारवाई वरून सिद्ध झाले आहे. रेती चोरी, सुगंधित तंबाखूचा तर महापूर आलेला आहे. थातुरमातुर कारवाया हा यावर पर्याय नसून पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका वठवावी अशी मागणी राम नवमी समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी केली आहे.

शांतताप्रिय शहर म्हणून वणीची ख्याती आहे, येथे जातीय धर्माचा कुठलाही वाद नसून सर्व नागरीक सलोख्याने राहतात. मात्र पोलीस प्रशासन व वाहतूक शाखेचा अनागोंदी कारभार आणि संपुष्टात आलेला पोलिसी वचक यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण राहिलेले नाही असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. यासर्व बाबींचा विचार करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी 9 जानेवारीला पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.
Rokhthok News

Previous articleभिषण अपघात… आजी -आजोबासह चिमुकली ठार
Next articleबापरे…नवजात बाळाला “चक्क” नालीत फेकले
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.