● 7 लाख 84 हजाराचा मुद्देमाल जप्त
वणी शहरातील खरबडा परिसरातून वाहनात निर्दयीपणे गोवंश जनावरे कोंबले होते. प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे शनिवार दि. 11 डिसेंबर ला रात्री दीड वाजताच्या दरम्यान अकरा गोवंशाची सुटका करून 7 लाख 84 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात वणी पोलिसांना यश आले.

वणी परिसरातून तेलंगणा व आंध्रप्रदेशात कत्तली करीता गोवंशाची तस्करी करण्यात येते. पोलिसांनी या प्रकारावर बराच आळा बसवला आहे मात्र लपूनछपून हा गोरखधंदा करणाऱ्यांच्या मुसक्या अवळण्यात येत आहे.
वणी शहरातील खरबडा मोहल्ला हा जनावरांच्या तस्करीचे केंद्र बिंदू बनले आहे. पोलिसांनी या भागातून शेकडो जनावरांची सुटका तस्कराकडून केली आहे.
ठाणेदार श्याम सोनटक्के यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून सपोनी माया चाटसे यांना खरबडा परिसरात पाठवण्यात आले होते.
या प्रकरणी राजु मधुकर झिलपे (25)रा रंगनाथ नगर, इलीयास अली खान मुमताज अली खान (40) गोकुल नगर व शाहरूख खान लायलाभ खान (28) रा. रंगनाथ नगर असे अटकेतील तस्करांची नावे आहेत.
निर्दयीपणे चाऱ्याविना MH-34-VG -2884 या वाहनात जनावरे भरून कत्तलीसाठी नेण्याचा तयारीत असताना पोलिसांनी कारवाई केली. गोवंशाची सुटका करण्यात आली असून आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार पो.नि. श्याम सोनटक्के यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. माया चाटसे, सुदर्शन वानोळे, अविनाश बानकर, अशोक टेकाडे, विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी केली.
वणी :बातमीदार