Home Breaking News अखेर ..तो माथेफिरू तरुण पोलिसांच्या ताब्यात

अखेर ..तो माथेफिरू तरुण पोलिसांच्या ताब्यात

1033

अनिल देरकरांवर केला होता जीवघेणा हल्ला
संशयित आरोपी 8 दिवसापासून होता फरार

जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर यांचेवर मारेगाव तालुक्यातील वेगाव येथे माथेफिरू तरुणाने दि. 5 नोव्हेंबर ला जीवघेणा हल्ला चढवला होता. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ माजली होती. हल्ला करणारा तरुण संशयित आरोपी 8 दिवसापासून फरार होता. मारेगाव पोलिसांनी गुरुवारी रात्री त्याला ताब्यात घेतले आहे.

Img 20250422 wa0027

राहुल सूर असे त्या माथेफिरू संशयित आरोपीचे नाव आहे. अनिल देरकर हे घटनेच्या दिवशी आपल्या जिल्हा परिषद मतदार संघात फेरफटका मारत असताना त्यांचेवर अचानक राहुल सूर या तरुणाने हल्ला चढवला.

Img 20250103 Wa0009

या घटनेत देरकर यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. डोक्याजवळ 7 टाके लागले, त्यांचेवर तातडीने उपचार करण्यात आले. सध्यस्थीतीत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी राहुल सूर याचेवर गुन्हा नोंद केला मात्र या दरम्यान आरोपी पसार झाला होता. 7 दिवसापासून पोलीस त्याचे मागावर होते. गुरुवारी तो मारेगाव येथील शांतीनगर परिसरातील घरी परतल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले.

सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पूजलवार यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राजेश पुरी, आनंद आलचेवार, नितीन खांदवे, अजय वाभीटकर, भालचंद्र मांडवकर यांच्या पथकाने केली.
मारेगाव: बातमीदार