● गुरूनगर परिसरातील घटना
वणी :- शहरातील गुरूनगर परिसरात असलेल्या किराणा दुकानाला रात्री 2 वाजताचे सुमारास भीषण आग लागून दुकान जळून खाक झाले आहे.

गुरूनगर परिसरास तुकाराम माथनकर यांचे जय गुरुदेव किराणा दुकान आहे. शनिवारी रात्री 2 वाजताचे सुमारास या दुकानाला अचानक आग लागली पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले होते.
आगीने संपूर्ण दुकान आपल्या कवेत घेतले या आगीत दुकानातील किराणा समान जळून खाक झाले आहे. या भीषण आगीत 30 ते 40 लाखाचे नुकसान झाले असून नेमकी आग कशी लागली याची माहिती मिळू शकली नाही. अग्नीशमन दलाच्या तीन वाहनांनी आग आटोक्यात आणली.
वणी : बातमीदार