Home Breaking News अज्ञात मृतदेह… विद्युताघात, उष्माघात, मदिराघात की घातपात..!

अज्ञात मृतदेह… विद्युताघात, उष्माघात, मदिराघात की घातपात..!

1202

राजूर परिसरातील घटना

वणी: राजूर फाटा परिसरातील पेट्रोल पंपालगत 35 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. ही घटना बुधवार दि. 18 मे ला दुपारी उजागर झाली. तो मृतक कोण? त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला याबाबत तर्कवितर्क लढविल्या जात असून विद्युताघात, उष्माघात, मदिराघात की घातपात हे तापसांती स्पष्ट होणार आहे.

Img 20250422 wa0027

राजूर परिसरात विविध उद्योगधंदे स्थापित झालेले आहे. तेथील बहुतांश कामगार परप्रांतीय असून राहुट्या करून वास्तव्यास आहेत. आढळलेला मृतदेह अज्ञात असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. अर्धनग्न अवस्थेत तो मृतक तारेच्या कुंपणालगत बसलेल्यास्थितीत असल्याने संशयाची पाल चुकचूकतेय.

Img 20250103 Wa0009

एक दिवसापूर्वी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान तो व्यक्ती तिसऱ्या डोळ्यात (CCTV) कैद झाला आहे. तो शौचास गेला असेल तर त्याने अंगावरील सर्व कपडे का काढले, रखरखत्या उन्हात तो तेथे का बसला असावा, अति मद्यपान केल्याने तर अनर्थ घडला नाही ना! किंवा तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाह तर नव्हता ना असे नानाविध प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

घडलेल्या घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. तर तपास यंत्रणा कार्यान्वित करून त्या मृतकाची ओळख पटविण्यात येत आहे. शव विच्छेदन अहवाल व तापसांती त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे स्पष्ट होणार आहे.
वणी: बातमीदार

Previous articleरोहन ने प्राप्त केली MBBS ची पदवी
Next articleअखेर….शेतकऱ्यांसमोर बाजार समिती नमली
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.