● मारेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना
मारेगाव: तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेली 17 वर्षीय बालिका सोमवारी दुपारी 12 वाजता शौचास गेली असता तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून त्या दोन्ही नराधमांच्या मुसक्या अवळण्यात मारेगाव पोलिसांना यश आले आहे.

शहबाज शेख शब्बीर (27) रा. मातानगर व नुकताच आठरावर्षं पूर्ण झालेला शिवाजी नगर राळेगाव येथे राहणारा, असे दोघे नराधम आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. मारेगाव तालुक्यात घडलेल्या या घटनेने चांगलीच खळबळ माजली आहे.
एका खेडेगावात मोलमजुरी करणारी बालिका गावालगत असलेल्या शेत शिवारात दुपारी शौचास गेली होती. दरम्यान एक दुचाकीस्वार आणि त्याचा साथीदार तेथे पोहचले. त्या अनोळखी तरुणांना बघताच तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दोघांनी तिला फरपटत एका झुडुपाच्या आड नेले.
एका नराधमाने तिच्यावर बळजबरी ने अत्याचार केला तर दुसरा काही अंतरावर उभा राहून कोणी येत तर नाहीना याची चाचपणी करीत होता. घडलेल्या प्रकाराने ती पीडित बालिका प्रचंड घाबरली. तिने घडलेला प्रकार आईवडिलांना सांगितला. तिच्या पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठून ठाणेदार सपोनी राजेश पुरी यांना आपबिती सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ तपास यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.
सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपीच्या प्राप्त मोबाईल क्रमांका वरुन सायबर सेल यवतमाळ यांच्या कडुन नमुद मोबाईल क्रमांकाचे लोकेशन घेवुन तपास आरंभला असता नराधम राळेगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले. राळेगाव पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींच्या मुसक्या अवळण्यात आल्या. त्या दोघांवर कलम 376, 376 (2) (जे) भा.द.वी. सहकलम 4, 6, 8 बा.लै.अ.प्र.का चा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मारेगाव: बातमीदार