Home Breaking News आज मद्यपींची होणार चांगलीच ‘गोची’

आज मद्यपींची होणार चांगलीच ‘गोची’

1465

वणी व शिरपूर हद्दीतील दारु दुकाने बंद
इतिहासात पहिल्यांदा पोलीस प्रशासनाचा निर्णय

कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता सण उत्सवात दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आपल्या पातळीवर देत असतात. त्यांच्याच आदेशाचा संदर्भ देत वणी ठाणेदार शाम सोनटक्के व शिरपूर चे ठाणेदार गजानन कडेवार यांनी आपल्या पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व दारू दुकाने व अनुध्यप्त्या रविवार दि. 17 ऑक्टोबर ला बंद ठेवण्याचा आदेश पारित केल्याने मद्यपींची आज चांगलीच गोची होणार असून इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतल्याचे बोलल्या जात आहे.

Img 20250422 wa0027

दारू दुकानांना नियंत्रित करण्याचे काम उत्पादन शुल्क विभाग करतो. वेळप्रसंगी जिल्हाधिकारी dry day घोषित करतात आणि त्याचे काटेकोर पालन व्हावे याकरिता उत्पादन शुल्क विभाग सर्व अनुध्यप्ती धारकांना सूचित करतात.

Img 20250103 Wa0009

दुर्गा विसर्जनाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या करीता जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र दारु बंदी कायदा कलम 142 (2) नुसार कारवाईचे अधिकार पोलीस प्रशासनाला बहाल केले आहे. यामुळे दि. 17 ऑक्टोबरला वणी व शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील CL-3, FL-3, CL-2, FL- 2 तसेच बिअर शॉपी हया सर्व अनुजप्त्या बंद राहणार आहेत.

सर्वत्र देवी विसर्जनाची धूम सुरू आहे, विसर्जनादरम्यान मद्य प्राशन करून नृत्य करण्याचे फॅड तरुणांमध्ये वाढले आहे. त्यामुळे मिरवणुकीत वादावादीच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. वणी पोलीस स्टेशन हद्दीत आज 102 देवींचे विसर्जन असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा व कोणताही वाद उत्पन्न होवू नये, शांततेत देवींचे विसर्जन व्हावेत या करिता पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करून दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पारित केले आहे. या बंदमुळे मद्यपींची आज चांगलीच गोची होणार आहे.

पोलीस प्रशासनाने दिलेल्या या आदेशाचे पालन न करणाऱ्या अनुध्यप्ती धारकांचा कायमस्वरूपी परवाना रद्द करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. मात्र अवैद्यपणे विक्री होणाऱ्या दारुवर पोलिसांनी नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

वणी: बातमीदार