● घोंसा येथील घटना
● शोधमोहीम सुरू
देवीचा घट विसर्जन करण्यासाठी गेलेला 50 वर्षीय इसम नदीपात्रात वाहून गेल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारी घडली होती. ग्रामस्थांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र ते आढळून आले नाही. यामुळेच प्रशासनाने Rescue team ला पाचारण केले आहे.
परतीच्या पावसाने चांगलाच कहर केला आहे. तालुक्यातील नदी, नाल्या दुथडी भरून वाहताहेत. घोन्सासह परिसरात रात्री कोसळलेल्या पावसामुळे विदर्भा नदीला पूर आला होता. त्यातच घरगुती देवीचा घट विसर्जन करण्यासाठी राजू श्रीहरी बोरकुटे (50) हे गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते अचानक प्रवाहात वाहून गेले.
नदी काठावर उपस्थित नागरिकांत चांगलीच खळबळ माजली. ही वार्ता ग्रामस्थांना कळताच त्यांची शोधाशोध करण्यात आली तसेच पोलीस व महसूल प्रशासनाला कळविण्यात आले होते. प्रशासनाने शोधमोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आणि Rescue team ला पाचारण केले.
रविवारी सकाळीच NDRF ची 11 व्यक्तींची team घोंसा येथे दाखल झाली. सकाळी 9 वाजतापासून शोधमोहीम राबविण्यात आली असून अद्याप वाहून गेलेल्या व्यक्तींचा थांगपत्ता लागलेला नाही. घटनास्थळी महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित आहेत.
घोंसा: प्रवीण नैताम





