Home Breaking News आणि…शेतकऱ्यांना सहन करावा लागतो ‘मनस्ताप’

आणि…शेतकऱ्यांना सहन करावा लागतो ‘मनस्ताप’

सन्मान निधीची किचकट प्रक्रिया

तुषार अतकारे: तालुक्यातील अनेक शेतकरी शासनाच्या सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची तरतुद करण्यात आली आहे. मात्र कागदपत्रांच्या त्रुटीमुळे किचकट प्रक्रियेचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्याने त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे. अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये सन्मान निधी जमा करण्यात येतो. शेतकऱ्यांच्या हितार्थ ही योजना राबविण्यात येत असल्याचा गाजावाजा करण्यात येत असला तरी शासनाची सन्मान निधी योजना लालफितशाहीत अडकल्याचे वास्तव नाकारता येत नाही.

जिल्हाधिकारी यांनी दि.10 मार्च ला उपविभागीय अधिकारी यांना पत्र दिले होते. मात्र त्या पत्राची कुठेही अंमबजावणी होतांना दिसत नाही. शेतकरी हितार्थ शासन, अनेक योजना राबवितात परंतु त्या योजना प्रशासनाच्या दिरंगाईत अडकुन पडत असल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप पिदूरकर यांनी केला आहे.

Img 20250103 Wa0009

शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीच्या लाभाकरिता शासन दरबारी किचकट प्रक्रियेचा सामना करावा लागतो. यामुळे होणारा मनस्ताप टाळण्यासाठी गावागावात डाटा दुरूस्तीसाठी शिबीराचे आयोजन करावे, अशी मागणी विजय पिदुकर यांनी निवेदनातुन लावुन धरली आहे. यावेळी रवि बेलुरकर, मंगल बलकी, धनराज राजगडकर, महादेव दातारकर उपस्थीत होते.
वणी: बातमीदार