Home Breaking News आमदार ससाने यांना दिलासा, अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर

आमदार ससाने यांना दिलासा, अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर

1136

प्रकरण कचरा घोटाळ्याचे
65 लाख रुपयांच्या अनियमिततेचा ठपका

उमरखेडवसंत देशमुख : घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट यामध्ये 65 लाखाची अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी उमरखेड पोलिसांनी 11 जणांविरुद्ध 7 फेब्रुवारी ला गुन्हा नोंद केला होता. सोमवार दि. 14 फेब्रुवारी ला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तत्कालीन नगराध्यक्ष तथा आमदार नामदेव ससाने यांच्यासह पाच जणांना अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर करून दिलासा दिला आहे.

Img 20250422 wa0027

नगर पालिकेत सन 2018 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत झालेल्या कचरा संकलन व विल्हेवाट प्रकरणात 65 लाख 70 हजार रुपयांची अनियमितता व गैरव्यवहार झाल्याची तक्रार MIM चे तत्कालीन नगरसेवक जलील कुरेशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. परंतु यावर ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली होती. न्यायालयाने नगर विकास मंत्र्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Img 20250103 Wa0009

शहर स्वच्छते बाबतच्या महत्वपुर्ण योजनेतच “कचरा घोटाळा” करणाऱ्यांच्या विरोधात नगरविकास मंत्रालयाने कठोर निर्णय घेत जिल्हाधिकारी यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तात्काळ दखल घेत विद्यमान मुख्यधिकारी यांनी पोलिसात तक्रार दाखल करावी असे आदेश पारित केले होते.

कचरा घोटाळा प्रकरणी तत्कालीन नगराध्यक्ष तथा विद्यमान आमदार नामदेव ससाने यांचेसह तत्कालीन मुख्याधिकारी गणेश चव्हाण, कंत्राटदार गजानन मोहळे, कंत्राटदार फिरोजखान आजाद खान, मजूर पुरवठादार पल्लवी इंटरप्राईजेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रशेखर जयस्वाल, तत्कालीन पाणीपुरवठा सभापती दिलीप सुरते, आरोग्य सभापती अमोल तिवरंगकर, महिला व बालकल्याण सभापती सविता पाचकोरे यांच्यासह लेखापाल सुभाष भुते, आरोग्य निरीक्षक विशाल श्रीवास्तव असे एकूण अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते या निर्णयाविरोधात आमदार नामदेव ससाने यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले. तर दुसरीकडे त्यांच्यासह पाच जणांनी  पुसद येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.

सोमवारी सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड माधवराव माने’ अॅड. आदित्य माने यांनी आरोपींच्या वतीने युक्तीवाद करतांना, नगरपरिषद अधिनियम अंतर्गत कलम 58(2)चा गैरवापर केल्याच्या ठपक्यावर आक्षेप घेतला आणि आपली बाजू मांडली.

सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील ए. एस. डावखरे यांनी शासनाचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आमदार नामदेव ससाने, माजी नगराध्यक्ष चंद्रशेखर जयस्वाल, दिलीप सुरते, अमोल तिवरंगकर  व सविता पाचकोरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करीत, पुढील सुनावणीसाठी 17 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली. दरम्यानच्या काळात सर्व आरोपींनी आपले पासपोर्ट व तत्सम कार्य कागदपत्रे उमरखेड पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
उमरखेड: बातमीदार