Home Breaking News कोळसा खाणीतील डीझेल चोरटे ‘गजाआड’

कोळसा खाणीतील डीझेल चोरटे ‘गजाआड’

6 आरोपी ताब्‍यात,12 लाखाचा मुद्देमाल जप्त
शिरपुर पोलीसांची कारवाई

रोखठोक | : तालुक्‍यातील शिरपुर पोलीस स्‍टेशनच्‍या हददीत कोळसा खाणीतील डोझर मधुन होत असलेल्‍या डिझेल चोरीचा शिरपुर पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. प्राप्त गोपनीय माहीतीच्या आधारे शुक्रवार दि. 24 फेब्रुवारीला रात्री 10 वाजताच्‍या सुमारास पोलीसांनी धाडसत्र अवलंबले. यावेळी 140 लिटर डिझलसह 2 चारचाकी वाहने असा 12 लाखाचा मुददेमाल जप्‍त केला असुन सहा आरोपींना ताब्‍यात घेण्‍यात आले आहे.

प्रफुल बंडु राजपुत (29) निलेश वसंत उज्‍वलकर (36) हे दोघे रा. उकणी, रोहीत सुनिल मंगाम (21) दशरथ कवडु खारकर (24) हे दोघे रा. बोरगाव, आकाश शंकर खाडे (26) रा. पिपंळगाव, सुमित बंडु वरारकर (29) रा.भालर असे डिझेल चोरटयांची नावे आहेत.

तालुक्‍यातील कोळसा खाणीमधुन डिझेल, भंगार चोरटयांचे रॅकेट बऱ्याच कालावधी पासुन सक्रीय असल्‍याचे दिसते. वेकोलीचे सुरक्षारक्षक गाफील असल्‍याने चोरटयांचे फावत असल्‍याचे बोलल्‍या जात आहे. कोळसा खाणीतील डोझरमधुन डिझेलची चोरी होत असल्‍याची कुणकुण ठाणेदार गजानन करेवाड यांना यापुर्वीच लागली होती.

Img 20250103 Wa0009

शुक्रवारी रात्री 10 वाजताच्‍या दरम्‍यान वेकोलीच्‍या उकणी कोळसा खाणीत कोल स्‍टॉक जवळ काही इसम संशयास्‍पद‍ रित्‍या फिरत असल्‍याची माहीती पोलीसांना मिळाली. ठाणेदार करेवाड यांनी तात्‍काळ उकणी खाणीत धडक दिली. तसेच एम एस एफ (MSF) सुरक्षा रक्षकासह कोल स्‍टॉक क्रमांक आठ जवळ धाडसत्र अवलंबले.

डिझेल चोरटे चार चाकी वाहन क्रमांक MH 34 BZ 0706 व MH 29 BC 2463 या दोन वाहनात प्‍लास्‍टीक कॅनमध्‍ये डिझेल भरलेल्‍या अवस्‍थेत आढळुन आले. यावेळी सहा चोरटयांना ताब्‍यात घेण्‍यात आले. वेकोलीचे सुरक्षा अधिकारी सुरेश एकनाथ हस्‍ते यांच्‍या तक्रारीवरून शिरपुर पोलीसात गुन्‍हा नोंद करण्‍यत आला असुन 140 लिटर डिझेलसह दोन चार चाकी वाहने असा एकुन 12 लाख 13 हजार 580 रूपयांचा मुददेमाल जप्‍त करण्‍यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड,  अप्‍पर पोलीस अधिक्षक पियुश जगताप, SDPO पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्‍या मार्गदर्शनात ठाणेदार सपोनी गजानन करेवाड, पोलीस उपनिरीक्षक रामेश्‍वर कांडूरे, सुनील दुबे, निलेश भुसे, गजानन सावसाकडे,  अभिजीत कोशटवार, अमोल कोवे, राजन इसनकर,  विजय फुलके यांनी केली.
वणी: बातमीदार