● नांदेपेरा मार्गावरील घटना
Accident News :
नांदेपेरा मार्गावरील मांगल्य बिअरबार जवळ शनिवारी रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान चढावरून समोर जात असलेला ट्रक मागे आला आणि ऑटोला धडकला. या अपघातात ऑटोचा पूर्णतः चेंदामेंदा झाला आहे. ऑटोतील तीन प्रवाशी जखमी झाले आहे. घटनास्थळी पोलीस पोहचले असून जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. Three passengers in the auto were injured.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक MH-40-CD-0976 ने निष्काळजीपणे नांदेपेरा कडे जात होता. थोडासा चढ आल्याने तो झपाट्याने मागे आला. त्याचवेळी ट्रकच्या मागे असलेल्या ऑटोला चांगलीच धडक बसली. यात वांजरी येथील ऑटो चालक भगवान मेश्राम, भाऊराव पाटील व इंदिरा पाटील हे किरकोळ जखमी झाले.
अपघातानंतर तातडीने स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविले. सर्वांची प्रकृती स्थिर असून ते तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे. या प्रकरणी पोलीस कारवाई सुरू आहे.
Rokhthok






