Home Breaking News खळबळजनक…. डोक्‍याला रिव्हॉल्वर लावून डॉक्‍टरचे अपहरण, पंचवीस लाखाची मागीतली खंडणी

खळबळजनक…. डोक्‍याला रिव्हॉल्वर लावून डॉक्‍टरचे अपहरण, पंचवीस लाखाची मागीतली खंडणी

2647

साडे तिन लाखाचा ऐवज लंपास
मारेगांव पोलीसात तक्रार

तुषार अतकारे |  मारेगांव तालुक्‍यातील नवरगांव येथे स्‍वतःचे क्लिनीक चालवणाऱ्या डॉक्‍टरच्‍या कनपटीवर रिव्हॉल्वर लावून अपहरण करण्‍यात आले. त्‍याला चारचाकी वाहनात डांबुन त्‍याच्‍या जवळील रोकड व सोन्‍याचा ऐवज काढून घेतला आणि 25 लाखाची खंडणी मागीतली. ही खळबळजनक घटना सोमवार दि. 13 मार्चला राञी घडली.

Img 20250422 wa0027

पोभास रविद्रनाथ हाजरा (45) असे डॉक्‍टरचे नांव आहे ते मारेगांव येथील मंगलम पार्क मध्‍ये वास्‍तव्‍यास असुन त्‍यांचे नवरगांव येथे सोहम क्लिनिक हा दवाखाना आहे. मागील पंचवीस वर्षा पासुन ते येथे स्‍थाईक झालेले आहे. घटनेच्‍या दिवशी ते आपले क्लिनिक बंद करुन एक्‍टीव्‍हा MH- 29- BB- 2867 ने मारेगांव कडे जात असतांना नायरा पेटोल पंप जवळ एका चारचाकी वाहनातुन आलेल्‍या चौघांनी त्‍यांना अडवले.

Img 20250103 Wa0009

स्विफ्ट वाहनातुन दोघे तरुण खाली उतरले व डॉक्‍टरच्‍या डोक्‍याला रिव्हॉल्वर लावले आणि वाहनात डांबले. डोक्‍याला रिव्हॉल्वर आणि पोटाला चाकु लावून करणवाडी बस स्‍थानका जवळ त्‍या आरोपींनी डॉक्‍टर जवळील 24 हजार रुपयांची रोकड, अंगठी व चेन असा 69 हजार रुपयांचा ऐवज ताब्‍यात घेतला आणि 25 लाखाची खंडणी मागीतली अन्‍यथा मारुन टाकु अशी धमकी दिली. या अनपेक्षीत प्रकाराने डॉक्‍टर कमालीचे घाबरले.

ते चार आरोपी डॉक्‍टरला रिव्हॉल्वर दाखवून जिवाने ठार मारण्याची धमकी देत होते. यामुळे घाबरलेल्‍या डॉक्‍टरने वणीतील एका मिञाला 3 लाख रुपये मागीतले व अर्जट रोकड घेवून वणीतील एका ऑटोमोबाईल जवळ येण्‍यास सांगीतले. आरोपींनी वाहनाची काच खाली करत ती रक्‍क्‍म ताब्‍यात घेतली व काही अंतरावर डॉक्‍टरला खाली सोडून दिले आणि पसार झाले. घडलेल्‍या घटनेमुळे भयभित झालेल्‍या डॉक्‍टरने मारेगांव पोलीसांत राञी रितसर तक्रार दाखल केली असुन या घटनेने कमालीची खळबळ माजली आहे.
वणी: बातमीदार