● उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
Political News : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेने वणीतील नगरपालिकेच्या निवडणूक रणसंग्रामाला जोरदार सुरुवात झाली. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या शिंदे यांनी वणी येथे शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचारार्थ शासकीय मैदानावर सभा घेत लाडकी बहीण योजना कधीही बंद पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. “Ladki bahin yojana” will not let the scheme be closed..!

स्थानिक पातळीवर भाजप व शिवसेना (शिंदे गट) हे पालिका निवडणुकीत आमनेसामने उभे ठाकले आहे. सरकारच्या योजनेचा उहापोह करण्यात येत आहे. जाहीर सभेत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वणी नगर पालिकेवर शिवसेना (शिंदे गट) सत्तेत आली तर शहराच्या विकासासाठी निधीची कधीच कमतरता भासू देणार नसल्याचे स्पष्ट केले.
आयोजित जाहीर सभेत जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, विनोद मोहितकर, विजयबाबू चोरडिया, मनिष सुरावार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे कुणाल चोरडिया, शिवसेना उबाठा गटाचे उमेश पोद्दार यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.
अधिकृत प्रचाराच्या पहिल्याच दिवशी शिंदे यांनी सभा घेऊन शिवसेना (शिंदे गट) ने निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायल तोडसाम व 29 नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता.
Rokhthok






