Home Breaking News ग्रामीण भागातील महिलांचा कल मनसेकडे

ग्रामीण भागातील महिलांचा कल मनसेकडे

1032

मनसेत लक्षणीय incoming
सामाजिक बांधिलकी आणि ठोस भूमिका

वणी: मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सातत्यपूर्ण झंझावात, सामाजिक बांधिलकी आणि वेळेत घेतलेली ठोस भूमिका, यामुळे विशेषतः महिलांमध्ये मतपरिवर्तनाची लाट दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या पक्ष प्रवेशावरून ग्रामीण भागातील महिलांचा कल मनसेकडे असल्याचे स्पष्ट होत आहे.

Img 20250422 wa0027

सामाजिक, सार्वजनिक, आर्थिक व समाजपयोगी कार्य बेधडकपणे करण्यात अग्रेसर असलेला पक्ष म्हणून मनसेची ख्याती आहे. तरुणाईला आकर्षित करणारे नेतृत्व म्हणून पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना ओळखल्या जाते. त्या प्रमाणेच मनसेची विचारधारा रुजवत राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी मतदारसंघात चांगला जनाधार निर्माण केला आहे.

Img 20250103 Wa0009

विदर्भात त्यातल्यात्यात वणी विभागात पावसाने हाहाकार माजवला होता. अत्यावश्यक सेवा व मूलभूत गरजांची तात्काळ पूर्तता उंबरकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सैनिकांनी केली. पुरपीडित भागात मनसेने केलेले कार्य आणि समाजबांधवात निर्माण झालेली आपुलकीची भावना यामुळे मनसेत लक्षणीय incoming सुरू आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कार्य करण्याची संधी मिळावी याकरिता पक्षप्रवेशाचा झंझावात सुरू आहे. नुकताच कोना या गावातील शेकडो महिलां व पुरुषांनी मनसेत प्रवेश केला आहे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी राज्य उपाध्यक्ष अलका टेकाम- त्रिंबके, जिल्हाध्यक्षा अर्चना बोदाडकर अहोरात्र परिश्रम घेत आहे.

पक्षप्रवेश प्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रिया लभाने, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, वैशाली तायडे, ज्योती मेश्राम, शंकर पिंपळकर, रोशन शिंदे, वैभव पुराणकर, नितीन हनुमंते यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी: बातमीदार

Previous articleनंदीग्राम एक्सप्रेस पूर्वरत सुरू करा…!
Next articleती… बस तात्काळ सुरू करा…अन्यथा..!
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.