Home Breaking News चर्मकार समाजातील गुणवंताचा सन्मान

चर्मकार समाजातील गुणवंताचा सन्मान

● औचित्य अभिष्ठचिंतन सोहळ्याचे

C1 20240614 18163255

औचित्य अभिष्ठचिंतन सोहळ्याचे

Wani News | सामाजिक कार्यकर्ते तथा शासकीय कंत्राटदार संबा वाकुजी वाघमारे यांचा वाढदिवस शनिवार दिनांक 15 जूनला उत्साहात साजरा होत आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघ यवतमाळ, शाखा वणीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी चर्मकार समाजातील गुणवंताचा सन्मान करण्यात येणार आहे. Samba Wakuji Waghmare’s birthday is being celebrated with enthusiasm on Saturday 15th June.

समाजाप्रती आस्था आणि समाजबांधवांच्या उन्नतीचा अभिमान बाळगत गुणवंतांनी अनेक यशोशिखरे पादाक्रांत करावीत ही भावना ठेवत त्यांचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे. सोबतच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 10 वाजता घनकचरा व्यवस्थापन केंद्र, भालर रोड व प्रगती नगर पाण्याच्या टाकीजवळील मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता ग्रामीण रुग्णालय, येथे फळ वाटप तर दुपारी 02 वाजता रामदेवबाबा मूक बधिर शाळा, चिखलगाव येथे विद्यार्थाना गणवेश वाटप करण्यात येणार आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009