Home Breaking News त्याने… दुपट्याच्या साह्याने घेतला गळफास

त्याने… दुपट्याच्या साह्याने घेतला गळफास

● 40 वर्षीय ईसमाची आत्महत्या

C1 20240616 08174782

40 वर्षीय ईसमाची आत्महत्या

Sad News Wani | तालुक्यातील राजूर कॉलरी येथे वास्तव्यास असलेल्या 40 वर्षीय इसमाने घरी कोणीच नसल्याचे बघून दुपटयाच्या साह्याने गळफास घेतला. ही घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. He ended his life by hanging himself

विजय देवराव घोडाम (40) असे मृतकाचे नाव आहे. आपल्या घरातच त्याने गळफास लावून जीवन संपवले. ही बाब घरच्या मंडळींना कळताच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आले. त्याने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News

Previous articleचर्मकार समाजातील गुणवंताचा सन्मान
Next articleहारमोनी मिनरल्सला दिलेली NOC नियमबाह्य…!
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.