Home Breaking News टायर फुटल्याने कार अनियंत्रित, चौघे जखमी

टायर फुटल्याने कार अनियंत्रित, चौघे जखमी

चारगाव शिवारातील घटना

रोखठोक | वणी वरून चंद्रपूरला जात असलेल्या i20 या आलिशान कारचा टायर फुटला. वाहन अनियंत्रित झाले आणि रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने दोन लहान मुलासह चार जण जखमी झाल्याची घटना रविवार दि.26 मार्चला 4:30 वाजता चारगाव चौकी शिवारात घडली.

वणी येथील काम आटोपून एक परिवार आपल्या चंद्रपूर या गावी कार क्रमांक MH-34-BV- 8539 ने दुपारी जात होते. वाहन भरधाव होते त्यातच टायर फुटल्याने वाहन अनियंत्रित झाले आणि रस्त्याच्या कडेला पलटी झाले.

घटना घडताच स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. कार मधील जखमींना मदत करत त्यांना दुसऱ्या वाहनाने चंद्रपूरला रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या अपघातात दोन बालकासह एक वृद्धा व एक इसम असे चौघे जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींने सांगितले.

Img 20250103 Wa0009

नागरिकांनी जखमींना तातडीने उपचारार्थ हलवले आणि पोलिसांना सूचित केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र या घटनेतील जखमींची नावे कळू शकली नाही. पुढील तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुगत दिवेकर करताहेत.
वणी: बातमीदार