● गुंजच्या मारोती जवळ अपघात
वरोरा मार्गावर असलेल्या टी पॉईंट वर ट्रक ने दिलेल्या धडकेत दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना दुपारी 4 वाजताचे सुमारास घडली. मृत्यूकांची ओळख अद्याप पटलेली नाही.

वरोरा मार्गावर गुंज मारोती जवळ टी पॉईंट आहे.हा मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.वरोऱ्या वरून mh 34 bm 6011 या क्रमांकाच्या दुचाकीला mh 34 dg 1525 क्रमांकाच्या ट्रक ने मागून जोरदार धडक दिली.
धडकेने दोन्ही दुचाकीस्वार खाली पडले व मागवून येणाऱ्या ट्रक ने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटना घडतात ट्रक चालक फरार झाला असून घटनास्थळी पोलीस पोहचले आहे.अपघातात ठार झाले युवक नेमके कोण व कुठले आहे याची माहिती पोलीस प्रशासन घेत आहे.
वणी: बातमीदार