● रामकृष्ण महल्ले वणीचे ठाणेदार
वणी: सहा महिन्यापूर्वी वणी येथे ठाणेदार पदी नियुक्त झालेले शाम सोनटक्के यांची जिल्हा वाहतूक शाखा यवतमाळ येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्तजागी पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांची वर्णी लागली आहे.

जिल्ह्यातील हेविवेट पोलीस ठाणे म्हणून वणीला ओळखल्या जाते. या ठिकाणी नियुक्ती मिळविण्यासाठी चांगलीच रस्सीखेच असते. वैभव जाधव यांची नागपूर येथे प्रशासकीय बदली झाली होती. त्यामुळे रिक्त जागेवर जिल्हा वाहतूक विभाग सांभाळणारे शाम सोनटक्के यांची प्रभारी ठाणेदार पदावर वर्णी लागली होती.
सोनटक्के यांना काही दिवसातच कायम करण्यात आले होते. मागील महिन्यात आय जी च्या पथकाने वणी येथे धाडसत्र अवलंबले होते. यामध्ये मटका अड्डावर धाड टाकून 42 जणांना ताब्यात घेतले होते तर 4 लाखाचा सुगंधित तंबाकू जप्त करण्यात आला होता.
या प्रकरणी जिल्ह्या पोलीस अधीक्षकांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. तब्बल एक महिन्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ठाणेदार यांची कसुरीच्या कारणावरून बदली केली आहे. त्यांच्या जागेवर रामकृष्ण महल्ले यांची वर्णी लागली आहे.
वणी: बातमीदार