Home Breaking News तरुण धान्य व्यापाऱ्याची आत्महत्या

तरुण धान्य व्यापाऱ्याची आत्महत्या

7807

घरीच घेतला गळफास

रोखठोक |- शहरातील प्रगती नगर येथे वास्तव्यास असलेल्या 35 वर्षीय तरुण धान्य व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी 3 वाजताचे सुमारास घडली.

Img 20250422 wa0027

पियुष मेहता (35) असे व्यापाऱ्याचे नाव आहे. तो प्रगती नगर येथील रहिवासी असून तो धान्य खरेदीचा व्यवसाय करीत होता. शुक्रवारी त्याने राहत्या घरी गळफास घेतला. परिवाराच्या ही बाब लक्षात येताच त्याला येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मागे, वडिल पत्नी 5 वर्षाची मुलगी असा परिवार आहे त्याने आत्महत्या का केली याची माहिती मिळू शकली नाही.
वणी : बातमीदार

Img 20250103 Wa0009