Home Breaking News दुचाकींचा धक्का, शाब्दिक वाद आणि चक्क ‘हत्याच’

दुचाकींचा धक्का, शाब्दिक वाद आणि चक्क ‘हत्याच’

1478

शिताफीने तिघे जेरबंद, 1 लाखाचे बक्षीस
क्लिस्ट गुन्ह्याच्या तपासा करीता 6 पथके

वसंतराव नाईक शासकीय वैदयकीय महाविदयालयात M.B.B.S. च्या अंतीम वर्षामध्ये शिक्षण घेत असलेल्या 24 वर्षीय विद्यार्थ्यांची दि.10 नोव्हेंबर ला धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. अतिशय क्लिस्ट गुन्ह्याचा तपास पोलिसांच्या 6 पथकांनी लावला असून एक विधीसंघर्ष बालकासह तिघांना जेरबंद करण्यात आले आहे.

Img 20250422 wa0027

अशोक सुरेंद्र पाल (24) या M.B.B.S. च्या अंतीम वर्षामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण वैदयकीय क्षेत्र हादरून गेले तसेच जनमानस अस्वस्थ झाले होते. घडलेल्या घटनेमुळे विद्यार्थी चांगलेच संतप्त झालेत यामुळे महाविदयालय परिसरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले होते.

Img 20250103 Wa0009

वसंतराव नाईक शासकीय वैदयकीय महाविदयालयाचे अधीक्षक व जनसंपर्क अधिकारी डॉ. सुरेंद्र भुयार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यवतमाळ शहर पोस्टे ला गुन्हा नोंद करण्यात आला होता. यावेळी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते मात्र हत्येचा उलगडा होत नव्हता.

घडलेली घटना अत्यंत क्लिस्ट गुंतागुंतीची व आव्हानात्मक असल्याने सदर गुन्हयाच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे नेतृत्वाखाली यवतमाळ शहर पोलीस स्टेशन, अवधुतवाडी पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल अशी एकूण 6 पथके तयार करण्यात आली. तर शंभर च्या वर खबरी तैनात करण्यात आले होते.

घटनेच्या दिवशी रात्री 8 वाजताच्या दरम्यान भरधाव दुचकीस्वारांला डॉ. अशोक पाल यांचा धक्का लागला. यात शाब्दिक वादावादी झाली आणि वादाचे रूपांतर भांडणात झाले. दुचाकीवरील त्या माथेफिरू तरुणांनी डॉ. पाल यांचेवर चाकूने सपासप वार केले. छाती व पोटाच्या खाली गंभीर दुखापत झाली आणि अति रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अंकेश गुलाबराव सवळे (23) राहणार महाविर नगर, प्रविण संजीव गुंडजवार (24) राहणार सावित्रीबाई फुले सोसायटी यवतमाळ व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींचा शिताफीने शोध लावून गजाआड करण्यात आले तसेच आरोपीकडून गुन्हयात वापरलेले हत्यार व मोटार सायकल जप्त करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांच्या नेतृत्वाखाली LCB चे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक नंदकिशोर पंत, सपोनि अमोल पुरी, सपोनि गणेश बनारे, विवेक देशमुख, सपोनि खंडेराव, पोउपनि योगेश रंधे, बंडू डांगे, निलेश राठोड, बबलु चव्हाण, सलमान शेख, किशोर झेंडेकर, सुमित पाळेकर, अजय निबोळकर, रोशनी जोगळेकर, गजानन शिरसागर, अमित कदम, मिलीद दरेकर, निलेश घुसे, अलताफ शेख यांनी केली.
यवतमाळ: बातमीदार